खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित !
टिटवाळा, बातमीदार : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,मांडा टिटवाळा शहर प्रभाग क्र.६ वार्ड क्रं ८,९,१० याच्या वतीने खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. दि.९ जुलै रोजी प्रथमेश हॉल टिटवाळा पूर्व येथे आयोजित करण्यात आले. यावेळी अकोले विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्यासह राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई, कल्याण विधानसभा कार्याध्यक्ष उदय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला. आदर्श शिक्षिका यांचाही सन्मान करण्यात आला. गरीब गरजू ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. तसेच यावेळी मोठ्या सख्येने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले. वार्ड क्रं १० चे अध्यक्ष मोरेश्वर अण्णा तरे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोरेश्वर तरे नेहमीच आपल्या प्रभागात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवीत असतात. गेल्या दोन वर्षापासून नागरिकांचे जनजीवन हे विस्कळीत झालेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कुठे कमी पडू नये म्हणून अशा विद्यार्थ्यांना वह्या वाटप केले. ग्रामीण भागातील गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले. असे अनेक कार्यक्रम आपल्या प्रभागात राबविले आहे.
कार्यक्रमाला वार्ड क्रमांक १० चे अध्यक्ष मोरेश्वर अण्णा तरे, मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष सुहास कांबळे, वार्ड क्रमांक ९ चे अध्यक्ष कमलेश नागरे, वार्ड क्रमांक ८ चे अध्यक्ष महेश भोय, जिल्हा उपाध्यक्ष विनायक कालन, प्रवक्ते सागर वाकळे, समाजसेविका लावण्य कांबळे, टिटवाळा शहर प्रवक्ते तुषार वैद्य, महिला अध्यक्षा तृप्ती गायकवाड, सचिव वैष्णवी शिर्के, सुनंदाताई भांगरे, अकबर शेख, सुनील गोमल, सुनील भोईर, किरण तरे, संदीप तरे, हेमंत परटोले, परेश तरे, नगरसेवक वासुदेव पाटील, पंकज शेळके, योगेश थेटे, समाधान रोकडे, विजय भोईर, लालचंद पाटील, बाळकृष्ण लिंगायत, रुपेश कदम, संदीप धुमाळ, किशोर राठोड, राजीव जाधव, रुपेश कराळे, भरत बेडसे, भास्कर मोरे, मोहन केनेरी यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


No comments:
Post a Comment