Monday, 11 July 2022

उदय जाधव व नंदीनी जाधव यांच्या संयोजनाने एकादशी निमित्त दिंडी !!

उदय जाधव व नंदीनी जाधव यांच्या संयोजनाने एकादशी निमित्त दिंडी !!


कल्याण, बातमीदार : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा कार्याध्यक्ष तसेच कामगार सेलचे उदय जाधव व समाजसेविका नदिनी उदय जाधव ह्या दोन्ही दापत्य दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात येते. पण गेल्या दोन वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा साजरा करता आला नाही. कोरोना असल्याकारणाने आषाढी एकादशी साजरी करता आली नाही. ही यात्रा श्रावणी इंटरप्राईजेस रामदास वाडी ते विठ्ठल मंदिर पर्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. 
यात विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांनी देखील सहभाग घेतला होता. यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशचे प्रवक्ते महेश तपासे व इतर मान्यवर ह्या दिंडीला उपस्थिती होते. तसेच या दिंडीत लहान मुलं वयस्कर व महिला या दिंडीला मोठ्या उत्साहात सामील झाले होते. ढोल टाळ भजनांच्या गजरात या आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळा संपन्न झाला. एका तालात महेश तपासे व सर्व वारकरी नाचत होते. उदय जाधव यांनी आलेल्या सर्व नागरिकांना फराळ दूध फळ वाटप केले. उदय जाधव यांच्या वतीने सर्व नागरिकांना आषाढी एकादशी व बकरी ईद ची शुभेच्छा देण्यात आली. विधानसभा कार्याध्यक्ष उदय जाधव, समाजसेविका नंदिनी उदय जाधव, जिल्हाध्यक्ष हेमंत यादगिरी, अध्यक्ष भगवान साठे, कामगार सेल अध्यक्ष बापू कापुरे, वार्ड क्रमांक 25 चे अध्यक्ष पियुष मुजुमदार, जिल्हाध्यक्ष संजय जाधव, भूषण भानुशाली, राजन पवार, दिलीप देवकर, सनी, पप्पू केने, सिद्धेश यादगिरे, आप्पा गायकवाड, वर्षा बाविस्कर, संगीता यादगिरी, कनोजे, शकील शब्बीर बागबान, अनासर इस्माईल बागवान, शखिल शेखलाल बागवान, कलीम इसाक बागवान जुबेर मेहबूब बागवान, लियाकत शौकत बागवान आदी मान्यवर कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...