Monday, 11 July 2022

बी.के. बिर्ला कॉलेज कल्याण ते विठोबा मंदिर शहाड या पारंपारिक दिंडीचे आयोजन !

बी.के. बिर्ला कॉलेज कल्याण ते विठोबा मंदिर शहाड या पारंपारिक दिंडीचे आयोजन !


कल्याण, बातमीदार : आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर बी. के. बिर्ला कॉलेज व सेंचुरी रेयॉन हायस्कूलच्या वतीने ज्ञान दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 10 जुलै रोजी बी.के. बिर्ला कॉलेज कल्याण ते विठोबा मंदिर शहाड या पारंपारिक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या दिंडीला चेअरमन गव्हर्नर कौन्सिल ओ. आर. चीतलागे, बी. के. बिर्ला पब्लिक स्कूल कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, प्राचार्य अविनाश पाटील, संचालक नरेश चंद्रा, प्रेसिडेंट गव्हर्नर कौन्सिलिंग सुबोध दवे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी नागरिक व वारकरी उपस्थित होते. ताल, मृदुंग ह्या तालावर ताल ठेवत विठ्ठलाचा नाम अंकुश करत सर्व वारकरींनी यावेळी दिंडीला सुरुवात करून विठ्ठलाचे दर्शन घेतले.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...