Monday, 11 July 2022

आषाढी एकादशीच्या निमित्ताने कल्याण पूर्व येथील सेंट मेरी शाळेत वारी आणि संगीत कार्यक्रमाचे आयोजन !! "कल्याण पूर्व येथील सेंट मेरीज शाळेची आषाढी वारी अंबरनाथ आर्य गुरुकुलच्या दारी"

आषाढी एकादशीच्या निमित्ताने कल्याण पूर्व येथील सेंट मेरी शाळेत वारी आणि संगीत कार्यक्रमाचे आयोजन !!

"कल्याण पूर्व येथील सेंट मेरीज शाळेची आषाढी वारी अंबरनाथ आर्य गुरुकुलच्या दारी"


कल्याण, बातमीदार : ९ जुलै रोजी परंपरेप्रमाणे सेंट मेरीज शाळेत यावर्षीही हरिनामाचा गजर दुमदुमला. आशाढी एकादशीच्या निमित्ताने शळेत वारी आणि संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या प्राचार्या सौ. दिव्या बोरसे व सी.ई.ओ. डॉ. विंदा भुस्कुटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षकवृंद यांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. संपूर्ण शाळेला भक्तिमय स्वरुप आले होते. आषाढी एकादशी या पारंपारिक उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यात आली होती.


‘प्रत्येक पाऊल प्रत्येक पायरी, प्लास्टिक प्रदूषणाचा नाश करी, पर्यावरण संवर्धन रुजवू घरी दारी, आषाढी एकादशी हि सकळ जणांची वारी, हरिनामाचा गजर गाऊनी हरितक्रांतीचा वसा घेऊ शिरी.’ असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, विठ्ठलनामाचा गजर करीत वारी पोहोचली. आर्य ग्लोबल संस्थेच्या अंबरनाथ येथील आर्य गुरुकुल या शाळेत सर्व बाल वारकरी यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. शाळेत पोहचताच  विद्यार्थ्यांनी लेझीम, रिंगण, फुगडी यांसारखे पारंपारिक कार्यक्रम हरिनामाच्या जयघोषणात सादर केले. हे सर्वच कार्यक्रम सादर करतांना विज्ञानाशी सांगड घालण्यात आली होती. तसेच या आषाढी वारीला शाळेच्या गाणवृंदाने साथ देऊन आणखीनच कार्यक्रमाची शोभा वाढवली. 


सेंट मेरीज शाळेसोबतच संस्थेच्या आर्य गुरुकुल व मॉडर्न हायस्कूल या शाळांनी देखील उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे आर्य गुरुकुल शाळेचे प्राचार्य निलेश राठोड यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. अशा या जल्लोशात उत्साहवर्धक वातावरणात आर्य ग्लोबलचे चेअरमन भरत मलिक आणि विशिष्ट वळणाने शाळा पुढे नेऊ पाहणाऱ्या शाळेच्या डायरेक्टर डॉ. निलम मलिक यांच्या उपस्थितीने वारीत वेगळीच रंगत आली. एकता, पर्यावरण संवर्धन, सहकार्य, समन्वय, अध्यात्मिक अशा अनेक गुणांची रुजवणूक करणाऱ्या या वारीची सांगता प्रसाद वाटून व हरिनामाचा जयघोश करुन करण्यात आली.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...