*(ठाणे- उदय दणदणे)*
रविवार दिनांक : १० जुलै २०२२ रोजी श्री सुरेंद्र गावस्कर सभागृह दादर पूर्व मुंबई येथे "गणेश भक्त कोकणवासीय प्रवाशी संघ' मुंबई आयोजित विध्यार्थी गुणगौरव सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
गणेश भक्त कोकणवासीय प्रवासी संघ, मुंबई संस्थेच्या वतीने गणपती उत्सव आणि पंढरपूर यात्रेसाठी ग्रुप बुकिंग करून देण्याचा महत्वपूर्ण नियोजन करण्यात येते. संस्थेचे एक हजार पेक्षा अधिक सभासद असून ह्या वर्षी संस्थेकडे ५०० ग्रुप बुकिंग अर्ज आले आहेत.
उपरोक्त संस्थेच्या वतीने सामाजिक ,शैक्षणिक, असे विविध उपक्रम राबविले जातात.त्यात प्रामुख्याने विद्यार्थी गुणगौरव, स्नेहसंमेलन विदयार्थी मार्गदर्शन, आश्रम आणि आदिवासीपाडा यांच्यासाठी मदत देणगी देऊनआपले कर्तव्य बजावत आहे.
ह्या वर्षी विशेषतः आषाढी एकादशी असून सुद्धा गुणगौरव सोहळयाला कमालीची उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थिती विद्यार्थांना सन्मानित करण्यात आले. सोहळ्या प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ह्या कार्यक्रमास "जिवन आनंद" या संस्थेचे संस्थापक, चिटणीस मा. संदीप परब साहेब, मा.भाग्येश लाड, समाजसेवक मा. डॉ. भगवान काळे साहेब,एसटी अधिकारी श्री. भडकमकर साहेब तसेच महाराष्ट्र संध्याचे पत्रकार मनोज कदम साहेब उपस्थिती होते.
संस्थेचे कार्याध्यक्ष मा.श्री दिपक चव्हाण साहेब, कोषाध्यक्ष श्री विश्वनाथ मांजरेकर साहेब, संघटक श्री अनिल काडगे साहेब आणि विभाग वार पदाधिकारी यांनी एसटी बुकिंग संदर्भात सभासदां मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. कार्यवाहक - श्री.चंद्रकांत बुदर यांनी केले. तर मा. अध्यक्ष- श्री रवींद्र मुकनाक साहेब यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.



No comments:
Post a Comment