कल्याण तालुक्यातील एकमेव गोवेली ग्रामीण रुग्णालयाची दुर्दशा, मंत्रीच नसल्यामुळे निधी कोण देणार ?
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील ग्रामीण जनतेला आधार वाटणारे एकमेव गोवेली येथील ग्रामीण रुग्णालयाची मोठी वाताहात झाली असून ती दुरुस्ती साठी आवश्यक असा निधी मिळणे गरजेचं आहे. परंतु राज्यात सध्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शिवाय दुसरे मंत्रीच नसल्यामुळे आवश्यक तो धोरणात्मक निर्णय कोण घेणार? अशी परिस्थिती निर्माण झाली असून याचा नाहक त्रास गोरगरीब नागरिकांना बसत आहे.
कल्याण तालुक्यातील गोवेली या मध्यवर्ती ठिकाणी १९९२ च्या आसपास ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आले आहे.२०/२५ विभाग असलेल्या या रुग्णालयात बहुतांश सोईसुविधा उपलब्ध आहेत, अगदी इसीजी पासून ते सर्पदंश, विंचू, श्वान, यासह अनेक छोट्या मोठ्या आजारावर उपचार केले जातात. गोरगरीब व कष्टकरी शेतमजूर आदिवासी जनतेसाठी हे रुग्णालय तमाम नागरिकांना आधार वाटते.
परंतु सध्या या रुग्णालयाची पूरती वाताहत झाली आहे. स्त्री आंतररुग्ण कक्षात लाद्या उखडलेल्या आहेत, ड्रेनेज लाईन चा प्राब्लेम आहे, दर्शन भागात पत्रे पुटलेले आहे, तसेच अधूनमधून लाईटच्या समस्या आहेत. मागील ठेकेदारांने चुना लावायचे काम केल्यामुळे बहुतेक विभागातील लाद्या उखडण्याच्या मार्गावर आहेत. येथील वैद्यकीय प्रशासनाने वरीष्ठांना तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या संदर्भात पत्रव्यवहार केला आहे. परंतु सध्या राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शिवाय कोणत्या च "खात्याला" मंत्री नसल्यामुळे खर्चास मंजुरी, निधी कोण देणार हा यक्षप्रश्न आहे.
स्वतः ला लोकांचे लोकप्रतिनिधी म्हणवणारे डोंगर, झाडी, हॉटेल ओके म्हणत आहे, मी कसा कोणाचा समर्थक हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत.परंतु येथे ज्यांच्या जिवावर आपण निवडून आलो, त्यांना मात्र आरोग्य सारख्या मुलभूत सोई सुविधा मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.




No comments:
Post a Comment