सहयाद्री कुणबी संघ, पुणे शहर तर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा व तुळशी रोप वाटप कार्यक्रम संपन्न !
मुंबई - ( दिपक कारकर ) : उपरोक्त संस्थेच्या वतीने दरवर्षी पुणे शहरातील इ.१० वी व इ.१२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते. दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करत असतो. या वर्षी नंदादीप माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका सौ. सीमा कुलकर्णी मॅडम यांनी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकार/महिला आघाडी उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर विठ्ठलवाडी, पुणे येथे महिला आघाडीच्या वतीने भाविक भक्तांस मोफत तुळशी रोप वाटप करण्यात येते. या कार्यक्रमात अग्निशमन दलातील जवान पोलीस कर्मचारी व महिला भगिनी या सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कोरोना नंतर बऱ्याच कालावधी नंतर संस्थेच्या वतीने दोन्ही कार्यक्रमाचे आयोजन एकाच दिवशी करण्यात आल्यामुळे संस्थेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या मध्ये नवीन सामाजिक कार्य करण्यासाठी उत्साह व जोश निर्माण झाला होता. अल्पवधीत आपल्या कार्याचा ठसा महाराष्ट्रभर उमटविणाऱ्या सहयाद्री कुणबी संघाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.


No comments:
Post a Comment