Thursday, 14 July 2022

गुरुपौर्णिमेनिमित्त अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांची आगळी वेगळी गुरुदक्षिणा !

गुरुपौर्णिमेनिमित्त अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांची आगळी वेगळी गुरुदक्षिणा !


अंबरनाथ, बातमीदार : शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली व पुढाकाराने अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. गुरुपौर्णिमेनिमित्त एक आगळी वेगळी गुरुदक्षिणा म्हणून आपल्या प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य शालेय शिक्षण साहित्य वाटप व रिक्षा चालकांना रेनकोट व छत्री वाटप करण्यात आले. 


यावेळी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्षा मनीषा ताई वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, माजी नगरसेवक संभाजीनगर युवा सेना विस्तारक निखिल वाळेकर यांच्या सहकार्याने भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष विजय पवार, संभाजी कळमकर, प्रकाश गावडे, स्वप्निल जाविर, मिलिंद गण, पद्माकर दिघे, अरविंद मालुसरे, संजय सावंत, जयश्री गुप्ता, हसीना शेख, संदीप मांजरेकर, अरुण कुमार सिंह, किशोर सोरखाते, महिला शहर संघटक नीता परदेसी, मालती पवार, चंदा गड, रेखा जेटवा, वासुदेव शिरूर, सुप्रिया मालूसरे, जयश्री गुप्ता, हसीना शेख तसेच असंख्य शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, कार्यकर्ते  उपस्थित होते. यावेळी मोठया संख्येने संख्येने नागरिकांनी लाभ घेतला.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

उदयनगर (डांगर बु.) येथे २५ वा अखंड हरिनाम सप्ताह व रौप्य महोत्सव !

उदयनगर (डांगर बु.) येथे २५ वा अखंड हरिनाम सप्ताह व रौप्य महोत्सव ! ** भक्ती , परंपरा आणि सामाजिक एकतेचा दिव्य संगम जळगाव, प्रतिन...