Thursday, 14 July 2022

गुरुपौर्णिमा निमित्त ओम साई युवा प्रतिष्ठान तर्फे श्री सत्यनारायणाची पूजा व साई भंडारा !

गुरुपौर्णिमा निमित्त ओम साई युवा प्रतिष्ठान तर्फे श्री सत्यनारायणाची पूजा व साई भंडारा !


कल्याण, बातमीदार : ओम साई युवा प्रतिष्ठान तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमा निमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा व साई भंडारा याचे आयोजन करण्यात आले. 


ओम साई युवा प्रतिष्ठानचे डॉ. पंकज उपाध्याय यांनी श्री साई क्लिनिक, साई विठ्ठल टॉवर, बेतूरकर पाडा, काळा तलाव, कल्याण पश्चिम येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमेनिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा व भंडाराचे आयोजन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.यावेळी सरचिटणीस डॉ. पंकज उपाध्याय, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी मनसे आमदार प्रकाश भोईर, कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, कल्याण जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, शहर कार्याध्यक्ष स्वप्निल काटे, शहर उपाध्यक्ष नितीन सपकाळ, युवा मोर्चा अध्यक्ष साई गोईकणे, तेजस केबारे, शहर उपाध्यक्ष राजेश ठाणगे, महिला जिल्हाध्यक्ष प्रिया शर्मा, माजी नगरसेविका वैशाली पाटील तसेच मोठ्या संख्येने बीजेपी कार्यकर्ते, पदाधिकारी, युवासेना व नागरिक उपस्थित होते.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण स्वयंसेवकांचा Capacity Building of Civil Defence (क्षमता, बांधणी व विकास) प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण !!

नागरी संरक्षण स्वयंसेवकांचा Capacity Building of Civil Defence (क्षमता, बांधणी व विकास) प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण !! ...