Tuesday, 12 July 2022

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस मिळाले नवे आयुक्त ! "ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती"

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस मिळाले नवे आयुक्त ! "ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती"


कल्याण, बातमीदार : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या कारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच आज ठाणे जिल्ह्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांना हटवून ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे यापूर्वी नगर विकास मंत्री होते त्यामुळे राज्यातील महापालिका नगरपरिषदा यांच्या कारभारावर त्यांचे नियंत्रण होते. आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्त झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे होम पीच असलेल्या ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साफसफाईला सुरुवात केली आहे. त्यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सन २०११ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झालेले डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.

विजय सूर्यवंशी यांच्या कामकाज करण्याच्या पद्धतीवर मुख्यमंत्री हे काहीसे नाराज असल्याची चर्चा पालिका वर्तुळात होती त्यामुळे त्यांची बदली होणार ही चर्चा होतीच मात्र त्याआधीच मुख्यमंत्र्यांनी विजय सूर्यवंशी यांची नवीन नियुक्ती न करताच वेटिंग वर ठेवत कल्याण पालिका आयुक्त पदावरून त्यांची बदली केली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

प्रशासनाच्या आशीर्वादाने वनविभागात बेकायदेशीर कारभार?कल्याण तालुक्यातील बेपर्वा व निर्ढावलेल्या अधिकाऱ्यावर, नागरिक संतप्त !**

प्रशासनाच्या आशीर्वादाने वनविभागात बेकायदेशीर कारभार? कल्याण तालुक्यातील बेपर्वा व निर्ढावलेल्या अधिकाऱ्यावर , नागरिक संतप्त !** ...