Thursday, 7 July 2022

काय ती माती... काय तो सुगंध... काय ते कष्ट... "शेतातील बांदावरील जेवणाची" चवच भारी

काय ती माती... काय तो सुगंध... काय ते कष्ट...

"शेतातील बांदावरील जेवणाची" चवच भारी  


           भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. अनेक तऱ्हेचे व्यवसाय केले जातात. पण शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. म्हणूनच भारताला 'कृषी प्रधान देश' म्हणून सुद्धा ओळखले जाते. शेतकरी भारताचा कणा आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत त्याचे १७% योगदान आहे. 


शेतकऱ्यांमुळेच भारत आज अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे. या शिवाय दर वर्षी खूप सारे खाद्यान्न भारतातून इतर देशांना निर्यात केले जाते.शेतकरी सकाळी लवकर उठतो आपले बैल आणि इतर सर्व सामान घेऊन शेताकडे निघतो. तासनतास तो शेतात काम करतो. शेतकऱ्यांच्या घराचे इतर लोक सुद्धा शेतात त्याची मदत करतात. शेतकऱ्याचे जेवण अतिशय साधे असते. बरेच शेतकरी चटणी भाकर खाऊन दिवस काढत असतात. दुपारी शेतकऱ्यांच्या घरून त्याची पत्नी किंवा दुसरे कोणीतरी जेवण घेऊन येते.शेतकरी जेवण करून काही मिनिटांच्या विश्रांती नंतर पुन्हा आपल्या कामाला लागतो. तो कठीण परिश्रम करतो. पण एवढ्या परिश्रमानंतर देखील त्याला जास्त लाभ होत नाही.


शेतकऱ्याचे जीवन खूपच साधे असते. त्याचा पेहराव ग्रामीण असतो. बरेच शेतकरी कच्या घरात राहतात. शेतकऱ्याची संपत्ती बैल आणि काही एकर जमीन असते. शेतकरी हा देशाची आत्मा असतो. लाल बहादूर शास्त्री यांनी 'जय जवान जय किसान' चा नारा दिला होता. त्यांनी म्हटले होते की शेतकरी हा भारताचा आत्मा आहे.म्हणून आज शेतकऱ्याला सरकार द्वारे अधिकाधिक मदत मिळायला हवी. त्यांना शेताचे सर्व आधुनिक यंत्र व कीटनाशके उपलब्ध करून द्यायला हवेत. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे राहणीमान, जेवण साधे जरी असले तरी शेतातील बांदावर बसून केलेल्या जेवणाची चव खूप भारी असते. एखाद्या हॉटेल मधील टेबलावर बसून केलेल्या जेवणापेक्षा उत्तम असते. हातावर भाकरी.. चटणी.. भाजी..झुणका भाकर... पावसापासून सुरक्षित म्हणून डोक्यावर प्लास्टिक कागद किंवा घोंगडी.. अशा परिस्थितीत जेवण करताना एक वेगळाच आनंद मिळतो.काय ती माती... काय तो सुगंध... काय ते कष्ट....काय मग येताय का बांदावरील जेवणाची मज्जा घ्यायला...!

शांताराम ल. गुडेकर ; मु. पो. आंगवली
ता. संगमेश्वर ; जिल्हा - रत्नागिरी 
+91 98207 93759

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...