कल्याण, दि. ६ दरवर्षी ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टी, पुरपरिस्थितीमुळे वा वादळासारख्या आपत्तीमुळे जीवितहानी व वित्तहानीस सामोरे जावे लागते. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षीच्या पावसाळ्याची सुरुवात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून झाली असून मागील एक, दोन दिवसापासून ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील पूर प्रवणतेचा विचार करता पुरपरिस्थिती , इमारत/ दरड कोसळणे , वाहतूक कोंडी तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीतीत आपत्तींना सामोरे जाणेसाठी मान्सून कालावधी करीता, बचावकार्यासाठी मा. संचालक, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत ठाणे जिल्ह्यासाठी NDRF च्या दोन पथकांची नेमणूक करण्यात आली असून त्यापैकी २२ जवानांची एक टीम कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर व भिवंडी साठी देण्यात आली आहे. सदर NDRF टिमने काल सायंकाळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली आणि त्यांचेशी चर्चा करुन कल्याण डोंबिवलीतील भौगोलिक परिस्थितीचा आढावा जाणून घेतला.
अतिवृष्टीच्या काळात दुर्गाडी परिसरात तसेच अंबिका नगर, शहाड या सखल परिसरात पाणी साचून लोकांची मोठया प्रमाणात गैरसोय होते, यासाठी आज NDRF च्या पथकाने महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक निकम यांच्या समवेत दुर्गाडी गणेश घाट परिसर, अंबिका नगर, शहाड या परिसराची पाहणी केली.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी निर्देशानुसार NDRF च्या या पथकाच्या निवासाची व तद्अनुषंगिक व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात आली आहे.


No comments:
Post a Comment