Friday, 8 July 2022

माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळयासाठी आरपीआय सेक्युलर गट करणार पाठपुरावा !

माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळयासाठी आरपीआय सेक्युलर गट करणार पाठपुरावा !


कल्याण, बातमीदार : कल्याणमध्ये माता रमाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयासाठी आरपीआय सेक्युलर गट देखील पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे अध्यक्ष श्याम गायकवाड यांनी दिले आहे. अजिंठा फाऊंडेशनचे अध्यक्ष अजय सावंत आणि इतर सदस्यांनी श्याम गायकवाड यांची भेट घेत त्यांना याबाबतचे पत्र देण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे अध्यक्ष श्याम गायकवाड यांना माता रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा म्हणून पत्र देण्यात आले. अजिंठा फाऊंडेशनच्या या मागणीला धरुन आरपीआय सेक्युलरच्या वतीने हि षासनाला पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. 

यावेळी अजिंठा फाऊंडेशन अध्यक्ष अजय सावंत, समाजसेवक बाबा रामटेके, मिलिंद गायकवाड, उत्तम जोगदंड, सुहास कोते, उदय चौधरी, घनश्याम गायकवाड, एन.के.सिंग, अशोक बहिरव, चंद्रकांत गायकवाड, अनिल धनगर, योगेश नाटकर, सिध्दार्थ गायकवाड आदी उपस्थित होते.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

वरप ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग? नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

वरप ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग? नागरिकांचे आरोग्य धोक्यात !  कल्याण, राजेंद्र शिरोशे : कल्याण तालुक्यात वरप ग्राम...