Friday, 8 July 2022

उद्या ९ जुलै रोजी दामोदर नाट्यगृहात कोकणातील सुप्रसिद्ध शाहीर येणार आमने सामने रसिकांची उत्सुकता शिगेला !

उद्या ९ जुलै रोजी दामोदर नाट्यगृहात कोकणातील सुप्रसिद्ध शाहीर येणार आमने सामने रसिकांची उत्सुकता शिगेला !


*(निवोशी /गुहागर :उदय दणदणे)*

कोकणात गेली दोन दशक पेक्षा अधिक काळ कलगीतुरा लोककलेचा माध्यमातून समाज प्रबोधन करत आपल्या कोकण कला संस्कृतीचा जतन करत विविध सादरीकरणाने कलगीतुरा लोककलेला बहुमान मिळवून देण्यासाठी गेली अनेक वर्षे शाहीर रामचंद्र घाणेकर यांनी आपल्या प्रापंचिक आयुषतील अधिक काळ सर्वस्व या लोककलेप्रति  वाहिले आहे. 

कलगीतुरा (शक्ति-तुरा) लोककलेतील त्यांचा अभ्यास खूप दांडगा आहे त्याचबरोबर रसिक चाहते ही  व्याप्ती खूप मोठी आहे.आजवर त्यांनी अनेक शाहीर शिष्य मंडळी घडवली आहेत आणि त्याच प्रति त्यांचे ऋणानुबंध जपत त्यांच्या शिष्य मंडळीच्या सहकार्याने  गणेश प्रोडक्शन निर्मित संजय मांडवकर, सुरेश भोसले, प्रदीप गुरव.आयोजित शाहीर रामचंद्र घाणेकर यांच्या सन्मानार्थ  दामोदर नाट्यगृह  परेल मुबंई येथे दिनांक-०९ जुलै २०२२ शनिवार रोजी रात्रौ -०८ -३० वाजता  (कलगीतुरा) शक्ती-तुरा नाचाचा जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदर सामना रायगड जिल्ह्यातील गेली अनेक वर्षे गाजलेली जोडी सदालाल घराण्यातील सुप्रसिद्ध शक्तीवाले *"शाहीर- विजय पायकोळी"* आणि शंभूराजू घराण्यातील सुप्रसिद्ध  तुरेवाले *"शाहीर- रामचंद्र घाणेकर"* यांच्यात रंगणार आहे सदर कार्यक्रमाचे तिकीट बुकींग हॉलवर सुरू असून अधिक माहितीसाठी *श्री सुधाकर मास्कर*- ८८५००९९०९० यांच्या कडे संपर्क साधावा असे आवाहन त्यांच्या शिष्य मंडळी यांच्या कडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...