पावसाळी उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांपासून मुरबाडकरांनी सावध रहावे ! नगराध्यक्ष- 'रामभाऊ दुधाळे' व मुख्याधिकारी- 'परितोष कंकाळ'
मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : सर्वत्र पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे तालुक्यात साथीच्या आजाराने डोके वर काढले असुन, आपले शहर स्वच्छ, सुरक्षित, व निरोगी राहण्यासाठी मुरबाडकरांनी सावध राहावे, सतर्क राहावे व स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. असे आवाहन मुरबाड नगरपंचायतच्या वतीने नगराध्यक्ष 'श्री.रामभाऊ दुधाळे' व मुख्याधिकारी 'परितोष कंकाळ' यांनी केले आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात थंडी ताप,डेंग्यू, मलेरिया, सारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला असुन, आपल्या शहरात ह्या पासून सतर्क राहण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरामध्ये व घराबाहेर पाणी साचु न देणे, पाणी साठवण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे, आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळणे, भंगार साहित्य व टायर्स इत्यादी वस्तू नष्ट करणे. घरामधील फुलदाण्या, कुंड्यांमध्ये, ट्रे, फ्रिज, डिफ्रास्ट ट्रे, एसी, फेईंगसुई मध्ये साचलेले पाणी किमान दोन दिवसांनी बदलण्यात यावे. अशा प्रकारची काळजी घेऊन, या आजारांची लक्षणे समजून घेण्यासाठी थंडी वाजून ताप येणे व थोडा वेळ ताप टिकणे, कमी होताना भरपूर घाम येऊन दिवसा उतरणे, दिवसा आड येणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, थकवा येणे हि हिवतापाची लक्षणे असुन, एकाएकी तिव्र ताप येणे, डोके दुखणे, स्नायूंचे दूखणे, उलट्या होणे, अशक्तपणा येणे, भुक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, ताप कमी जास्त होणे, अंगावर पुरळ येणे, अशी लक्षणे दिसून आल्यास आपणास डेंग्यूचा आजार होत आहे. असे समजून तात्काळ ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथे आवश्यक त्या रक्त तपासण्या करून उपचार करावेत. ह्या सर्व आजारांपासून सुरक्षित व निरोगी राहण्यासाठी आपला परीसर स्वच्छ ठेवावा. नुकताच तालुक्यात काही ठिकाणी थंडी ताप व डेंग्यूचे रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्यामुळे मुरबाड शहरातील नागरिकांनी आपली काळजी घ्यावी. असे आवाहन नगराध्यक्ष श्री. रामभाऊ दुधाळे व मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे..

No comments:
Post a Comment