Saturday, 16 July 2022

*बल्याणी रस्त्यासाठीचे आंदोलन तात्पुरते स्थगित - भारत कुमार सोनार* "महापालिका अधिकारी कोरे, इनामदार यांच्या विनंतीवरून आंदोलन मागे"

*बल्याणी रस्त्यासाठीचे आंदोलन तात्पुरते स्थगित - भारत कुमार सोनार*

"महापालिका अधिकारी कोरे, इनामदार यांच्या विनंतीवरून आंदोलन मागे"


कल्याण, संदीप शेंडगे : बल्ल्यानी रस्त्या दुरुस्त करण्यात यावा याकरिता करण्यात येणारे आंदोलन तात्पुरते करीत असल्याची घोषणा सत्याग्रह फोरमचे राष्ट्रीय संघटक भारतकुमार सोनार यांनी केली आहे. वार्ड क्रमांक ११ बल्यानी येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. बल्याणी टिटवाळा रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली होती. पावसामुळे या रस्त्यावर तळ्यांचे स्वरूप आले होते.
दुचाकी स्वार, चारचाकी स्वार, रिक्षावाले, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले, गरोदर महिला, यांना या रस्त्याने जाणे अतिशय कठीण झाले होते.


            या रस्त्यासाठी वारंवार नगर रचना विभागाकडे तक्रार करूनही या रस्त्याची कोणत्याही प्रकारची दोस्ती महापालिका करीत नव्हती. पालिकेकडे अनेकदा पत्रव्यवहार करून सुद्धा पालिका अधिकारी दुर्लक्ष करीत होते याकरिता सत्याग्रह फोरमचे राष्ट्रीय संघटक भारतकुमार सोनार यांनी १४ जुलै रोजी आक्रमक आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते.


            आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिकेला जाग आली आणि आंदोलनाच्या दिवशीच महापालिकेने रस्ता दुरुस्ती करण्याकरिता पथकाला पाठविले. रस्ता दुरुस्ती करण्याकरिता माणसे पाठवले आहेत काम सुरू झाले आहे आपण आंदोलन स्थगित करावे थांबवावे अशी विनंती महापालिका अधिकारी कोरे आणि उपअभियंते इनामदार यांनी आंदोलन यांनी सोनार यांना केली.
महापालिकेने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केल्याने रस्त्यासाठीच्या आंदोलन तात्पुरते स्थगित करणे करीत असल्याचे भारत कुमार सोनार यांनी स्पष्ट केले असले तरी जोपर्यंत संपूर्ण दुरुस्ती होत नाही तोपर्यंत सत्याग्रह फोरम शांत बसणार नाही तसेच रस्त्यासाठी ९ कोटी ४० लाख रुपये मंजूर झालेले आहेत नवीन रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी फोरम आग्रही असणार आहे तसेच रस्त्या दुरूस्तीचे काम अपूर्ण केले किंवा थांबविल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल असे सोनार यांनी सांगितले.
          पालिका अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन भारत कुमार सोनार यांनी आंदोलन स्थगित केले असले तरी महापालिका प्रशासन बल्ल्यानी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम कधीपर्यंत पूर्ण करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवलीच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल यूथ गेम चैंपियनशिपमध्ये प्रथम क्रमांकावर विजय !!

जी.के.एस कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवलीच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल यूथ गेम चैंपियनशिपमध्ये प्रथम  क्रमांकावर विजय !! ** अंतरराष्ट्री...