सलीम शेख व शिफा मशहर यांच्या प्रयत्नाने रस्त्याची सुधारणा !
कल्याण, बातमीदार : गेल्या अनेक दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याकारणाने रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच वल्ली फिर रोड या रस्त्याची अवस्था सर्वात खराब झाल्याने तिकडच्या रहिवाशांना मोठ्या संकटांना समोर जावे लागत आहे.
यावेळी तेथील रहिवाशांनी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष सलीम शेख व कल्याण डोंबिवली शहर जिल्हा उपाध्यक्ष शिफा मशहर यांची भेट घेऊन या त्याबद्दल सांगितले. त्यावर सलीम शेख व शिफा मशहर यांनी पाठपुरावा केला. या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वाहन चालकांना मोठ्या संकटाला समोर जावे लागत होते. केडीएमसी द्वारा जेसीबी मागवून त्या रस्त्याची लेवल करण्यात आली. याबद्दल तेथील रहिवाशांनी सलीम शेख व शीफा मशहर यांचे आभार व्यक्त केले.
सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण


No comments:
Post a Comment