कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर मद्य विक्रीला उधान !
"अवैध धंद्यांवर कारवाईची नागरिकांची मागणी".
कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाळेगाव येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मध्ये विक्री सुरू असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
गाळेगाव तरे मार्केट येथे ॲक्सिस एटीएमच्या मागे दोन ठिकाणी मध्य विक्री होत असून येथील मद्यपींकडून महिला व शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मध्ये खरेदी करण्याकरिता आलेले मद्यपी रस्त्यावर उभे राहून येणाऱ्या महिला व मुलींना छेडत असून त्यांचा प्रचंड त्रास महिलांना होत आहे तसेच काही मद्यपी तर रस्त्यावरच दारूची बाटली काढून दारू पीत आहेत बाजूलाच तरे मार्केट असून तरी चाळीतील महिलांना या मदतीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे मद्यपी महिलांकडे पाहून अश्लील चाळे करीत असून महिला असुरक्षित झाल्या आहेत तालुका पोलिसांनी तात्काळ या मद्यपीनवर कारवाई करण्याची मागणी येथील महिलांनी व रहिवाशांनी केले आहे.

No comments:
Post a Comment