Friday, 15 July 2022

उच्च शैक्षणिक क्षेत्रातील सर्वंकष क्रमवारीत देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक "प्रथम १० मध्ये मुंबई आयआयटी" चा तीसरा क्रमांक

उच्च शैक्षणिक क्षेत्रातील सर्वंकष क्रमवारीत देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक

"प्रथम १० मध्ये मुंबई आयआयटी" चा तीसरा क्रमांक


नवी दिल्ली, १५ : उच्च शैक्षणिक क्षेत्रातील सर्वंकष १०० उत्कृष्ट संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या १२ शैक्षणिक संस्थांच्या समावेशसह देशात राज्याने दुस-या क्रमांक पट‍काविला आहे. यासह प्रथम दहामध्ये मुंबई आयआयटी तिस-या क्रमांकावर आहे. 
 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘इंडिया रँकिंग -2022’ हा कार्य‍क्रम इंडिया हॅबीटेट सेंटर च्या स्टेन सभागृहात आयोजित करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान, केंद्रीय उच्च शिक्षण सचिव के. संजय मुर्ती, युजीसी चे अध्यक्ष एम. जे. कुमार तसेच शिक्षण क्षेत्रातील वर‍िष्ठ मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्री प्रधान यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वंकष क्रमवारी तसेच उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध ९ अभ्यासक्रमांची श्रेणी ‘इंडिया रँकिंग-2022’ ची यादी जाहीर केली. 
आज झालेल्या कार्यक्रमात प्रत्येक श्रेणीतील प्रथम तीन संस्थांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी 
देऊन सन्मानित करण्यात आले. 
 
उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वंकष १०० उत्कृष्ट संस्थांमध्ये राज्याचा दुसरा क्रमांक आहे. प्रथम क्रमांकांवर तामीळनाडूतील १८ उच्च शैक्षणिक संस्थांचा समोवश आहे. प्रथम १०० उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राज्यातील १२ संस्था आहेत. 
 
देशभरातील उत्कृष्ट 100 विद्यापीठांमध्ये राज्यातील 13 विद्यापीठांचा समावेश आहे. 

उत्कृष्ट 200 अभियांत्रिकी महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांमध्ये राज्यातील 17 संस्थांचा समावेश आहे. 

उत्कृष्ट 100 व्यवस्थापन संस्थांमध्ये राज्यातील 10 संस्थांचा समावेश आहे. 

उत्कृष्ट 100 फॉर्मेसी महाविद्यालय/संस्था/ विद्यापीठांमध्ये राज्यातील 16 संस्थांचा समावेश आहे.

उत्कृष्ट 50 वैद्यकीय महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांमध्ये राज्यातील 4 कॉलेज/संस्था/ विद्यापीठांचा समावेश आहे. 

 उत्कृष्ट 40 दंत महाविद्यालय/संस्था/ विद्यापीठांमध्यें राज्यातील 6 महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांचा समावेश आहे.
 
उत्कृष्ट 30 विधी महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांमध्ये राज्यातील 1 संस्थेचा समोवश आहे.  

उत्कृष्ट वास्तुकला महाविद्यालय/संस्था/ विद्यापीठांमध्ये राज्यातील 8 व्या क्रमांकावरील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर, या एका संस्थेचा समावेश आहे.

या संकेतस्थळावर सविस्तर यादी उपलब्ध आहे. https://www.nirfindia.org/2022/Ranking.html

No comments:

Post a Comment

जी.के.एस कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवलीच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल यूथ गेम चैंपियनशिपमध्ये प्रथम क्रमांकावर विजय !!

जी.के.एस कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवलीच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल यूथ गेम चैंपियनशिपमध्ये प्रथम  क्रमांकावर विजय !! ** अंतरराष्ट्री...