श्रीमती पी. एन. दोशी महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी केले वृक्षारोपण !
मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
सध्या होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास बघता पर्यावरणाचे रक्षण करणे काळाची गरज आहे. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. श्रीमती पी. एन. दोशी महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कसारा येथील मोखावणे गावात जवळजवळ पंधराशे झाडे लावून अत्यंत यशस्वीपणे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी श्रीम. पी. एन. दोशी महिला महाविद्यालयातील एनएसएस आणि एनसीसीचे असे मिळून जवळजवळ ८० विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी पकाले आणि शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. एन. एस. एस. चे झोनल कोऑर्डीनेटर डॉ. विनोद झालटे आणि कसारा विभागातील कार्यकर्ते राकेश पाटील यांनी कार्यक्रमाची योजना अंमलात आणण्यात विशेष हातभार लावला. त्याच प्रमाणे पी.एन.दोशी महाविद्यालयातील डॉ. शिवाजी मेठे, डॉ. वेद प्रकाश दुबे, एन.सी.सी.च्या कॅप्टन ज्योती माडये, सुजाता गरुड आणि अनिश पिल्लई हे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा मेनन याने विद्यार्थ्याचे भरभरून कौतुक केले आणि डॉ. रितू भाटिया यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

No comments:
Post a Comment