Thursday, 14 July 2022

!! गुजरातची लढाई भाजपसाठी सोपी नाही !!

!! गुजरातची लढाई भाजपसाठी सोपी नाही !!


          गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरताना भाजपसमोर 'ऍन्टी इन्कम्बसी' चे मोठे आव्हान आहे. 24 वर्षापेक्षा जास्त काळ भाजप राज्यामध्ये सत्तेत आहे. यावेळी भाजपला राज्याच्या राजकारणात नव्याने प्रवेश करणाऱ्या आम आदमी पक्षाकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागेल, असं राजकीय विश्लेषकांचे मत आहे. भाजप यावेळी सलग सातव्यांदा सत्ता राखण्यासाठी रिंगणात उतरेल.


           2022 च्या अखेरीस राज्यात निवडणुका होणार आहेत.भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातची सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने आपली रणनीती पुन्हा तयार केली आहे.हे लक्ष साध्य करण्यात ते यशस्वी झाले तर ते पच्शिम बंगालमधील सलग सात विधानसभा निवडणुक जिंकलेल्या डाव्या आघाडीच्या विक्रमाशी बरोबरी करतील.
           1995 पासुन सलग सहा निवडणुका जिंकलेल्या भाजपचे संख्याबळ 2017 च्या निवडणुकीत प्रथमच 182 पैकी 99 जागांपर्यंत खाली आले होते. त्यावेळी सत्ता राखण्यासाठी भाजपने मुख्यमंत्र्यांसह संपुर्ण मंत्रिमंडळ बदलले होते. अत्यंत प्रभावशाली पाटीदार समाजाचा मुख्यमंत्री नेमणे, पंतप्रधानांचे मोठ्या संख्येने दौरे असे अनेक प्रयत्न करून भाजप पुन्हा सत्तेत आले.
         यावेळी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी गुजरात जिंकणे महत्वाचे आहे, कारण 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीसाठी ते भाजपला उपयुक्त ठरेल, 'भाजप, गुजरातमधील आगामी निवडणुका जिंकण्यासाठी प्रत्नशील आहे.पंतप्रधान आणि गृहमंत्री येथे तळ ठोकून आहेत, 2002 पासून प्रत्येक निवडणुकीत भाजपचे संख्याबळ कमी होत चालले आहे. 2002 च्या निवडणुकीत भाजपने 127 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 2007 मध्ये 117, 2012 मध्ये 116 आणि 2017 मध्ये 99 जागा जिंकल्या होत्या. यावरून गेल्या काही वर्षात भाजपविरोधात एक प्रचंड सत्ताविरोधी भावना निर्माण होत आहे.आम आदमी पक्षाचा गुजरातमध्येही प्रवेश झाल्याने ते कदाचित भाजपला धोबी पछाड देऊ शकतात.

श्री.संजय शिवाजी फुलोरे, +91 93254 54686
आगरी सेना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य

सुचना - हे लेखकाचे व्यक्तिगत विचार आहेत..

No comments:

Post a Comment

महापौर हर्षाली चौधरी यांच्या विशेष प्रयत्नाने पॅनल क्रमांक ३ मध्ये डांबरीकरण रस्त्याच्या कामास सुरुवात !!

महापौर हर्षाली चौधरी यांच्या विशेष प्रयत्नाने पॅनल क्रमांक ३ मध्ये डांबरीकरण रस्त्याच्या कामास सुरुवात !! ** पदभार स्वीकारून दोनच दिवसातत रस...