मिरा भाईंदरचे 18 नगरसेवक शिवसेनेतून शिंदेसेनेत दाखल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मानले आभार !
भिवंडी, दि. १४, अरुण पाटील (कोपर) :
शिवसेनेला मीरा भाईंदरमध्ये मोठा धक्का बसला असून सेना नेते प्रताप सरनाईक यांच्या नैतृत्वात शिवसेनेचे अठरा नगरसेवक शिंदे गटात आज सामिल झाले आहेत. आज सायंकाळी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्पष्टोक्ती दिली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मीरा भाईंदरमधील शिवसेनेचे अठरा नगरसेवक शिंदे गटात सामिल झाले आहेत. बाळासाहेब ठाकरेंची भुमिका पुढे नेण्याचे काम करीत आहोत. मला पाठिंबा देणाऱ्या अठरा नगरसेवकांचे मनापासून मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.
एकनाथ शिंदे म्हणाले, गत काळात राज्यात घडामोडी झाल्या आहेत. हे सरकार एक भुमिका घेऊन स्थापन झाले. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे विचार पुढे नेणारे सरकार आहे. राज्याचा सर्वांगिण विकास करण्याची भूमिका आहे. नवीन स्थापन झालेल्या सरकारला मान्यता दिली गेली. तसेच शिंदे म्हणाले, आम्ही जेथे जात आहोत तेथे नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. आम्ही योग्य जबाबदारी पार पाडण्यासाठी जे करावे लागेल ते आम्ही करीत आहोत.
एकनाथ शिंदे म्हणाले, राष्ट्रपती पदाच्या उमेदवार आदिवासी महिला आहे. आदिवासी समाजाला प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय आहे. ही निवडणूक मोठ्या फरकारने द्रौपदी मुर्मू या जिंकतील. अर्धी निवडणूक त्यांनी जिंकली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्या भुमिकेला सर्वच थरातून पाठिंबा मिळत आहे. लवकरच मंत्रि मंडळाचा शपथविधी होईल. जे काही बोलले जात आहे ती वस्तूस्थिती नाही. दिशाभूल करणारी वक्तव्य करणाऱ्या वक्तव्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. लोकहिताचे निर्णय आम्ही घेत आहोत. शेतकऱ्यांसाठी, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी निर्णय आम्ही घेतले आहेत. राज्याच्या विकासाचे निर्णय आम्ही घेत आहोत.
आमचे सर्व निर्णय लोकहिताचे असेल, कुणाच्याही वैयक्तिक हिताचे नसतील. आधीच्या सरकारने असे निर्णय घेतले नाही त्यांना कुणी निर्णय घेण्याचे थांबवले होते काय असा सवालही त्यांनी केला.

No comments:
Post a Comment