७ हजार लाभार्थी घरापासून वंचित?
कल्याण-डोंबिवली महापालिका दहा वर्षां पासून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात असमर्थ -प्रहार ची मानवी आयोगाकडे धाव
प्रहार जनशक्ती पक्षा मुळे बंद करण्यात आलेल्या BSUP प्रकल्प नव्याने सुरू करण्याचा मार्गावर डॉ आदर्श भालेराव याच्या प्रयत्नाला यश
कल्याण डोंबिवली शहरे झोपडीमुक्त करण्यासाठी आणि गरिबांना हक्काची घरे देण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे दहा वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येत आहे. प्रकल्प राबविण्यासाठी उशीर झाल्याने १३ हजार ४६९ कुटुंबांपैकी ८ हजार १८८ लाभार्थीना घरे देण्याचा निर्णय झाला. मात्र येत्या वर्षभरात फक्त २ हजार ७५१ सदनिका बांधून पूर्ण होण्याची शक्यता असल्याचा अहवाल महापालिकेने दिल्याने उर्वरित लाभार्थ्यांना घरापासून वंचित राहावे लागणार आहे.
सात वर्षांत हे प्रकल्प पूर्ण न झाल्याने शासनाच्या आदेशावरून या प्रकल्पातील ५ हजार २८१ घरे रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने तीन वर्षांपूर्वी घेतला. त्यामुळे उर्वरित ८ हजार १८८ लाभार्थ्यांना घरे देण्याच्या निष्कर्षांप्रत महापालिका आली. मात्र, महापालिका अभियंत्यांची निष्क्रियता, अधिकारी, समंत्रकाने लाभार्थी यादीत घातलेला गोंधळ आणि अतिशय कूर्मगतीने सुरू असलेली झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाची कामे यामुळे येत्या वर्षभरात पुनर्वसन योजनेतील फक्त २ हजार ७५१ सदनिका बांधून पूर्ण होण्याची शक्यता आहे. उर्वरित ५ हजार ४३७ सदनिकांची बांधकामे पूर्ण होणे अशक्य असल्याने हे लाभार्थी हक्काच्या घरांपासून वंचित राहणार आहेत, असा धक्कादायक अहवाल महापालिकेने राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभागाला सादर केला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत गेल्या आठ वर्षांपासून शहरातील काही झोपडपट्टय़ांच्या जागांवर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या इमारती उभारणीचे काम सुरू आहे. केंद्र व राज्य शासनाने या प्रकल्पासाठी एकूण ६५४ कोटी ४६ लाख रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले आहेत. या प्रकल्पातून शहरातील गरिबांना १३ हजार ४६९ घरे बांधून देण्यात येणार होती. कल्याणमधील उंबर्डे, इंदिरानगर, डोंबिवलीतील कचोरे, दत्तनगर, आंबेडकरनगर, पाथर्ली, इंदिरानगर या ठिकाणी हे प्रकल्प उभारण्यात आले आहे. ज्या ठिकाणी प्रकल्पाच्या इमारती उभारण्यात येणार होत्या. त्यामधील काही जमिनी खासगी मालकीच्या, सरकारी असल्याचे आढळून आले आहे. काही ठिकाणी खासगी जमीन मालकांनी प्रकल्पाला अडथळे आणले. त्यामुळे २०१३ पर्यंत या प्रकल्पांची कामे अतिशय संथगतीने सुरू होती.
बांधकामांचा वाढता दर देण्यास ठेकेदारांना पालिकेने नकार दिला. त्यामुळे ठेकेदारांनी नवीन कामे सुरू करण्यास असमर्थता दर्शविली. या प्रकल्पाची नियंत्रक ‘म्हाडा’ने या संथगती कामाविषयी नाराजी व्यक्त केली होती. प्रकल्पाचा वाढता खर्च पाहून महापालिकेने तीन वर्षांपूर्वी १३ हजार सदनिकांपैकी ५ हजार २८१ सदनिका रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महापालिकेसमोर ८ हजार १८८ सदनिका बांधण्याचे आव्हान उभे राहिले. आठ वर्षांपूर्वी सुरू झालेले हे बांधकाम प्रकल्प दीड ते दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु आता आठ वर्षे उलटली तरी हे प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत. काही प्रकल्पांची कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. या गृहप्रकल्पांवर आतापर्यंत सुमारे २४४ कोटी खर्च झाले आहेत.
अहवालात दडलय तरी काय?
राज्याचे गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंग यांनी कडोंमपा हद्दीतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील संथगती कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून या सर्व प्रकल्प व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या नियंत्रणाखाली अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची समिती नेमली होती. या समितीने या प्रकल्पातील गोंधळाचा १ हजार पानाचा सविस्तर अहवाल प्रधान सचिव सिंग यांना दाखल केला आहे.
विकास प्रकल्पातील टप्पा १ मध्ये डोंबिवलीतील दत्तनगर, कचोरे, उंबर्डे, इंदिरानगर (कल्याण, बिर्ला महाविद्यालयाजवळ) येथील प्रकल्पात एकूण ४ हजार ५९१ सदनिका बांधण्यात येणार आहेत. गेल्या आठ वर्षांत या प्रकल्पात फक्त १ हजार ८४० सदनिकांचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.
टप्पा क्र.२ मधील कल्याणमधील बारावे, इंदिरानगर पाथर्ली येथील प्रकल्पात १ हजार ८४१ सदनिकांची कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. ही कामेही अपूर्णावस्थेत आहेत.
टप्पा क्र. ३ मध्ये खडेगोळवली येथे झोपु प्रकल्प उभारण्यात येणार होता. परंतु वेळेत हा प्रकल्प न उभारल्याने या प्रकल्पाचा सुमारे ५१ कोटीचा निधी व्याजासह शासनाला परत करावा लागला.
टप्पा क्र. ४ मध्ये खंबाळपाडा येथे १७५६ सदनिका बांधण्यात आली आहे. . ही कामे अपूर्णावस्थेत आहेत. मार्च २०१७ ही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिका पूर्ण करण्याची शेवटची मुदत होती . या कालावधीत फक्त २७५१ (८१८८ सदनिकांपैकी) सदनिका बांधून पूर्ण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या योजनेतील उर्वरित ५ हजार ५३७ लाभार्थी हक्काच्या घरांपासून वंचित राहण्याची शक्यता अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा अहवाल गृहनिर्माण सचिवांना सादर केला आहे. सदर
अहवालात व्यक्त केली आहे.कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत १३ हजार ४६९ घरे बांधून देण्यात येणार होती. पण काही कामचुकार आधिकारी वर्ग बेजबाबदार लोकसेवक याच्या मुळे गेल्या दहा वर्षां पासून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडले असून ७ हजार पेक्षा लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे. हजारो सदनिका तयार होऊन सुद्धा कल्याण-डोंबिवली महापालिका दुर्लक्ष करताना दिसत आहे.अशी माहिती भालेराव यांनी दिली. BSUP प्रकल्प कल्याण शहरातील गरिबांच हक्काचं घरकुल असताना देखील लाभार्थी यांना घरा पासून वंचित ठेवण्यात येत आहे. ह्यासाठी 2020 मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक डॉ आदर्श भालेराव यांनी महापालिका व राज्य सरकार ला धारेवर घेऊन पुन्हा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहे. ज्यामुळे लवकरच लाभार्थी यांना प्रहार च्या प्रयत्ना मुळे हजारो नागरिकांना त्याच्या हक्काचे घर मिळण्यास मदत होणार आहे. असे माहिती भालेराव यांनी दिली आहे.

No comments:
Post a Comment