Monday, 1 August 2022

म्हारळ ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याचा हदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, गावावर शोककळा !

म्हारळ ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याचा हदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, गावावर शोककळा !


कल्याण, (संजय कांबळे) : म्हारळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी विकास अशोक धनगर यांचे नुकतेच हदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्यांच्या अचानक मृत्यूने म्हारळ गावावर शोककळा पसरली असून ग्रामपंचायत कार्यालय आज बंद ठेऊन सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व कर्मचारी वर्ग यांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.


कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे, त्यामुळे येथील कर्मचारी संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहेत, यातील विकास अशोक धनगर हे वसुली पथकातील कर्मचारी होते.ते अनेक वर्षे कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांना काल अचानक हदय विकाराचा तीव्र झटका आला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे सगळेच चक्रावून गेले, प्रत्येक जण एकमेकांना संपर्क साधून खात्री करत होते. त्यांच्या जाण्याने म्हारळ ग्रामपंचायतीचे मोठे नुकसान झाले असून त्यांना श्रंध्दाजली वाहण्यासाठी आज एक दिवस म्हारळ ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रगती प्रकाश कोंगिरे, उपसरपंच अश्विनी देशमुख, सदस्य ग्रामसेवक कुटेमाटे व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी श्रंध्दाजली वाहिली आहे.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...