Tuesday, 30 August 2022

अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या तालुक्याध्यक्षपदी राहुल शिंदे !

अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या तालुक्याध्यक्षपदी राहुल शिंदे !



रत्नागिरी, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या देवरूख तालुकाध्यक्षपदी राहूल शिंदे यांची निवड करण्यात आली. समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णात कोरे आणि जिल्हाध्यक्ष सचिन गोवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

याबाबतची सभा मातृमंदिर देवरूख येथे पार पडली. संघटना स्थापनेसाठी जिल्हा प्रधान सचिव सुहास शिगम, युयुत्सु आर्ते, विलास कोळपे यांचे विशेष योगदान लाभले. या शाखा स्थापनेमुळे देवरूख आणि संगमेश्वर येथील भोंदू बाबाकडून होणाऱ्या शोषणाला आळा बसणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment

अवयवदान एक संकल्प - जनजागृतीच्या मार्गावर सुनील देशपांडे

अवयवदान एक संकल्प - जनजागृतीच्या मार्गावर सुनील देशपांडे  वयाच्या साठाव्या वर्षानंतर म्हणजेच ज्येष्ठ नागरिक (सीनियर सिटीजन झाल्य...