सरकारची दडपशाही, पहाटे तीन वाजता गणेशोत्सवाचा देखावा केला जप्त, पोलिसांची कारवाई, ऐकोणसाठ वर्षाचा गणेशोत्सव बंद, कल्याण मध्ये खळबळ ?
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण येथील प्रसिद्ध विजय तरुण मंडळाने सध्याच्या राजकीय परिस्थिती वर केलेल्या गणेशोत्सव सजावटीवर पोलिसांनी पहाटे ३ वाजता कारवाई केली, त्यामुळे या हिटलर शाही व दडपशाही विरोधात न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगून गेल्या ५९ वर्षांपासून सुरू असलेला गणेशोत्सव बंद करून या सरकारचा निषेध व्यक्त केला असल्याचे मंडळाचे पदाधिकारी विजय उर्फ बंड्या साळवी यांनी सांगितले.
कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. येथील मतदारांनी नेहमीच सेनेला भरभरून मतदान केले आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून उध्दव ठाकरे गट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्या जे काही कुरघोडी चे राजकारण सुरू आहे, ते जनता पहात आहे. अशातच येथील उध्दव ठाकरे यांचे खंदे समर्थक निष्ठावंत शिवसैनिक तथा कल्याण महानगर प्रमुख विजय साळवी, यांनी गळाला लावण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून झाला. परंतु आपली निष्ठा ठाकरे अर्थात मातोश्री सोबत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले होते.
त्यातच युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवसंवाद यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून तूफान प्रतिसाद मिळत आहे. ते प्रत्येक सभेत फुटून गेलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना "गद्दार" बोलून राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जाण्यचं आव्हान देत आहेत. एकूणच फुटीर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक तसेच जनतेमध्ये कमालीचा असंतोष आहे, त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या गटातील पदाधिका-यांना जाणूनबुजून त्रास देणे, दबाव आणणे, असे प्रकार सुरू आहेत असे आरोप अनेक सभामधून आदित्य ठाकरे व इतर सेना पदाधिकाऱ्यांनी केले आहेत.
असाच काहीसा प्रकार कल्याण मध्ये नुकताच घडला आहे. कल्याण मध्ये जी काही नामांकित गणेशोत्सव मंडळ आहेत त्यामध्ये रामबागेतील विजय तरुण मंडळाचा अग्रक्रम लागतो. ते प्रत्येक वर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय घडामोडींवर देखावा तयार करतात, त्यामुळे यांच्या गणेशोत्सवाला भक्तांची तूफान गर्दी असते. याही वर्षी सध्याच्या राजकीय परिस्थिती वर यांनी देखावा तयार केला होता.
विजय तरुण मंडळ हे आगळा वेगळा देखावा सादर करण्यात कल्याण येथे प्रसिद्ध मंडळ आहे. तसेच शिवजयंती असो की गणेश उत्सव मंडळांनी सादर केलेले देखावे लक्ष वेधून घेणारे असतात आणि या देखाव्याला पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी सुद्धा करतात. अफजलखानाचा वध तसेच असे अनेक देखावे मंडळाने सादर केले आहेत.. मंडळाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे खंदे समर्थक विजय तरुण मंडळाचे अध्यक्ष तसेच शिवसेना कल्याण महानगरप्रमुख विजय ऊर्फ बंड्या साळवी यांनी हा सत्य परिस्थितीवरील देखावा पोलिस उपायुक्तांना दाखवून संपुर्ण सजावट त्यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून करण्यात आली होती.
विजय तरूण मंडळाचा ५९ वा गणेशोत्सव आहे,असे असतानातीन पोलिस व्हॅन, लालदिव्यांच्या पोलिस बदोबस्त आधिकारी च्या दहा गाड्या, सीपी, डिसीपी, ऐसीपी, सिनियर पीआय व तीनशे पोलिस एवढे पोलिसबल आणुन रात्री तीन वाजता दडपशाही पद्धतीने कारवाई करण्यात आली. या घटनेचा निषेध म्हणून गेल्या ५९ वर्षांपासून सुरू असलेला गणेशोत्सव बंद करत असल्याचे मंडळाचे पदाधिकारी विजय साळवी यांनी जाहीर केले, शिवाय या सरकारच्या हिटलरशाही विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे ही सांगितले.त्यामुळे या प्रकारामुळे गणेश भक्तांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे तर विविध स्थरातून याचा निषेध व्यक्त केला जात आहे.
दोन-अडीच वर्षांपासून कट कारस्थान करून धर्मवीर नावाचा मूवी बनवून लोकांची फसवणूक केली ते चालतं आणि साद सत्य लोकांना जर गणपती मंडळाने दाखवलं ते यांना चालत नाही.धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा नाव घेऊन सत्तेवर येऊन सरंमजामशाही चालवणं हे या लोकांकडून शिकलं पाहिजे स्वतःला मराठी म्हणतात आणि महाराष्ट्राचा इतिहास विसरले गद्दार
ReplyDeleteनिषेध निषेध निषेध