Tuesday, 30 August 2022

गणेशघाटासह, कांबा ग्रामपंचायत हद्दीतील तलाव आणि विविध विकास कामांचे आ. कुमार आयलानी यांच्या हस्ते उद्घाटन !

गणेशघाटासह, कांबा ग्रामपंचायत हद्दीतील तलाव आणि विविध विकास कामांचे आ. कुमार आयलानी यांच्या हस्ते उद्घाटन !


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील आणि उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील म्हारळ, कांबा येथील विविध विकास कांमाचे उद्घाटन आज आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते झाले, यावेळी परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तालुक्यातील सर्वात मोठ्या म्हारळ गावाकरिता गणेशोत्सव गणपती विसर्जनाकरिता मोठी अडचण येत होती. ही बाब गावातील ग्रामपंचायत सदस्य तसेच मंडळ अध्यक्ष योगेश देशमुख, प्रमोद देशमुख, समाजसेवक महेश देशमुख आदी सदस्यांनी आमदार कुमार आयलानी यांना सागितलं होते. याची दखल घेऊन आज रिजेन्सी अंन्टेलिया येथील स नं ५६ मध्ये गणेशघाटाचे उद्घाटन आज आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कांबा ग्रामपंचायत हद्दीतील टाटा पावरहाऊस जवळ व वरप ग्रामपंचायतीला लागून असलेल्या तलावाच्या  सुशोभीकरणाचे उद्घाटन देखील आ कुमार आयलानी यांनी केले.


यावेळी कांबा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसंरपच सदस्य, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख दत्ता भोईर, वरप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डॉ. भगवान भोईर, म्हारळ ग्रामपंचायतीचे सदस्य, मंडळ अध्यक्ष योगेश देशमुख, प्रमोद देशमुख, लक्ष्मण कोंगिरे, समाजसेवक महेश देशमुख, बाळा गायकर, वरपचे राजेश भोईर, उल्हासनगरच्या माझी महापौर मिना आयलानी, भाजपाचे महासचिव महेश सुखरामानी,  उल्हासनगर शहर भाजपा अध्यक्ष जमनू पुरुसवानी, कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यानंतर उल्हास नदीच्या काठावर असलेल्या श्री क्षेत्र सिध्देश्वर मंदिर परिसरात देखील विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार कुमार आयलानी यांनी केले.



यावेळी भविष्यात म्हारळ, वरप कांबा परिसरात विविध अडचणी, समस्या, सोडविण्याचे काम तसेच विकास कामांचे उद्घाटन लवकरच होतील असे या भागाचे भाजपाचे मंडळ अध्यक्ष योगेश देशमुख यांनी सांगितले. तर कांबा ग्रामपंचायत हद्दीतील तलाव हा गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित होता, याच्या भोवती बांधकाम, जँगीग ट्रँक, आदी सोईसुविधा निर्माण केल्या तर परिसरातील नागरिकांची सोय होईल, असे कांबा गावचे माजी पोलीस पाटील संजय भोईर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

पत्रकार भीमराव धुळप “प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२४” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !

पत्रकार भीमराव धुळप “प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२४” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित ! मुंबई (उत्कर्ष गुडेकर) :         आधुनिक...