ऐन गणेशोत्सवात कल्याण ग्रामीण भागात डेंग्यूचे 'विघ्न' प्रशासन सतर्क, नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज ?
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील ८ ते १० ग्रामपंचायत हद्दीत केवळ आँगस्ट महिना अखेर पर्यंत तब्बल १४ डेंग्यू व डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आले असून यामुळे ऐन गणेशोत्सव काळात तालुक्यावर डेंग्यू चे विघ्न आले असून यामुळे उशिरा का होईना प्रशासन सतर्क झाले आहे. याशिवाय नागरिकांनीही काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
पावसाने नुकतीच विश्रांती घेतली आहे, परंतु सांडपाणी, कचरा, गटारे, तसेच ज्या ज्या ठिकाणी डेंग्यू च्या डांसाची पैदास होते अशी ठिकाणी उदा पाण्याचे ड्रम, टाक्या, नारळांच्या करवट्ंया, टायर, झांडाच्या कुंड्या, इमारती बांधकाम ठिकाणी येथे विशेष काळजी घेतली जात नाही, शिवाय धुरफवारणी, स्वच्छता, दूषित पाणी आदी बाबतीत ग्रामपंचायती म्हणावे तसे लक्ष देत नाहीअसा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.. याचाच परिणाम तालुक्यातील तब्बल १४ रुग्ण हे डेंग्यू व डेंग्यू संशयित म्हणून गोवेली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. यातील काही अजूनही रुग्णालयात आहेत.
तालुक्यातील दहिवली,अनखरपाडा, पोई, कोलम, म्हसरोंडी, पिंपळोली, घोटसई, टिटवाळा आदी भागातील पेंशटांची नोंद गोवेली ग्रामीण रुग्णालयात २९ आँगस्ट पर्यंत झाली असून यातील काही बरे होण्याच्या मार्गावर आहेत तर काहीचे रिपोर्ट हे अद्याप प्राप्त झाले नाहीत,म्हसरोंडी गावातील कु कल्याणी वसंत गुटे ही ११ वर्षाची मुलगी रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.
*प्रशासन सतर्क-तालुक्यात मलेरिया, टायफॉईड, डेंग्यू आदी आजाराचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे, गोवेली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रसाद भंडारी यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली, यावेळी स्वच्छता,रुग्णांची विचारफूस त्यांना औषध उपचार व्यवस्थित मिळतो का? जेवण, नाष्टा, येतो का? आदी बाबतीत प्रशासनातील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या, तसेच काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील दुरावस्थेचे वृत्त पत्रकार संजय कांबळे यांनी दिले होते, ती दुरावस्था दूर केल्याचेही डॉ. भंडारी यांनी सांगितले. तसेच काही कामचुकार व नागरिकांच्या तक्रारी असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुरबाड येथे हलविण्यात आले असले तरी गोवेली ग्रामीण रुग्णालयाचा स्टाफ कमी होणार नाही याची ही काळजी घेण्यात येईल असी ही हमी त्यांनी दिली.
तर कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या म्हसरोंडी येथील कु कल्याणी वसंत गुटे पेशंट ची माहिती मिळताच त्यांच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शशिकांत जाधव, सरपंच, पोलीस पाटील आदीनी रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली, व गावात लवकर धुरफवारणी करण्यात येईल असे सांगितले. या शिवाय नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस पाळावा असे अवाहन वैद्यकीय अधिका-यांनी केले.
No comments:
Post a Comment