Monday, 29 August 2022

अवैध गुटखा विक्री प्रकरणी उरण येथे सहा जणांवर कारवाई !

अवैध गुटखा विक्री प्रकरणी उरण येथे सहा जणांवर कारवाई !


उरण, प्रतिनिधी : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पेण युनिटच्या पथकाने प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या उरण भागातील ६ पान शॉपवर गुरुवारी छापा मारून कारवाई केली आहे.

यावेळी शॉपमधील हजारो रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त करून उरण पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पेण युनिटने गुरुवारी उरणमधील ओएनजीसी रोडवर चारफाटा येथे असलेल्या सहा पान शॉपची तपासणी केली होती. यावेळी येथील पान शॉपमध्ये प्रतिंबधित असलेला गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी असा हजारो रुपये किमतीचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने नबाकांता अधेक (४२), पंकज गुप्ता (३८), अमित शर्मा (२९), राहुल गुप्ता (३६), बाबू तौडा (७५) आणि सदानंद नायर (६२) यांच्याविरोधात उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment

पत्रकार भीमराव धुळप “प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२४” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !

पत्रकार भीमराव धुळप “प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२४” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित ! मुंबई (उत्कर्ष गुडेकर) :         आधुनिक...