म्हारळ ते पाचवामैल रस्त्याची दुर्दशा ! "स्थानिकांकडून आंदोलन"
कल्याण, नारायण सुरोशी : कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर कल्याण तालुक्यातील म्हारळ पाडा ते पाचवा मैल या दरम्यान गेले तिन वर्ष सतत खड्डे पडुन नागरीकांना व प्रवाशांना त्रास होत होता तसेच अपघात होऊन काही जणांना जिव गमवावा लागला तर अनेकजण जखमी झाले आहेत, या विरोधात रमेश हिंदुराव, महेश देशमुख, कॉ. रमेश गायकवाड, विशाल मोहपे, जगन्नाय शेट्टी, अश्वीन भोईर, दिलीप भोईर यांनी म्हारळपाडा येथे उपोषण सुरु केले होते यात युको जिप संघटना सहभागी झाली होती. या आंदोलनाची दखल प्रसार माध्यमांनी घेतली या मागण्या संधर्भातील प्रमुख मागणी आसलेली मान्य करण्यात आली आसुन पाउस कमी होताच डांबरीकरणाने खड्डे भरण्याचे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता तृप्ती नाग यांनी दिले आसल्याचे लेखी पत्र उपविभागीय अभियंता कटके यांनी मा. कुमार आयलानी आमदार यांच्या उपस्थीतीत आंदोलन कर्त्यांना दिले.
या आंदोलनात सुदाम भोईर, बाळु हरड, विष्णु पष्टे, वसंत गायकर, रवी चंदने, बाळाराम गायकवाड यांनी सहभाग घेतला. प्रसार माध्यमांनी याची गंभीर दखल घेण्यास रा.मा. अधिकार्यांना भाग पाडले व आमदार कुमार आयलानी यांनी अधिकार्यांना धारेवर धरले. या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व नागरीकांचे आभार मानले असून रस्त्याच्या खड्ड्यांचा त्रास होऊनही सहभागी न झालेल्या निष्क्रीय जनतेबद्दल नापसंती व्यक्त केली व दिलेल्या आश्वासनाप्रमणे डांबरीकरण करून घेण्यास नागरीकांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांना भाग पाडावे असे आवाहन महेश देशमुख, रमेश हिंदुराव यांनी केले.
No comments:
Post a Comment