Thursday, 15 September 2022

भिवंडीतील पूर्णा गाव येथील खाद्यतेलाच्या गोदामास भिषण आग, लाखो रुपयांचा माल जळून खाक !

भिवंडीतील पूर्णा गाव येथील खाद्यतेलाच्या गोदामास भिषण आग, लाखो रुपयांचा माल जळून खाक !


भिवंडी, दिं,१५, अरुण पाटील (कोपर )
       भिवंडी तालुक्यातील पुर्णा ग्रामपंचायत हद्दीतील अरीहंत कंपाऊंड येथील खाद्य तेल व औषधे साठविलेल्या गोदाम इमारतीस बुधवारी सकाळी ९-१o च्या दरम्यान भिषण आग लागून  गोदामे  जळून खाक झाली आहेत. त्या मध्ये लाखो रुपये किमंतीचे साधन सामुग्री सुध्दा जळून खाक झाली आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र आगीचे निदान होऊ शकले नाही.


       भिवंडी तालुक्यातील पुर्णा ग्रामपंचायत हद्दीतील अरीहंत कंपाऊंड येथे तळ अधिक एक मजली या इमारतीत टोरेंट फार्मास्युटीकल्स कंपनीचे गोदाम असून तेथे तळ मजल्यावर खाद्य तेल तर पाहिल्या मजल्यावर औषध साठा साठविलेला होता. सकाळी अचानक आग लागल्याने परिसरात आरडा ओरडा सुरू झाली या आगी संदर्भात अग्निशमन दलास पाचारण करण्यात आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी रासायनिक द्रव्य मिश्रित पाण्याचा फवारणी मारा सुरू केला होता.


         मात्र तो पर्यंत या आगीने उग्र रूप धारण केल्याने लगत असलेली सहा गोदामास आगीची झळ लागल्याने साठवण्यात आलेली संपूर्ण मालमत्ता व साधनसामग्री साठा जळून खाक झाला.भिषण आगीच्या धगी मुळे संपूर्ण इमारत मागील बाजूस कोसळल्याने तेथील चाळीचे नुकसान झाले आहे.
          आगीने उग्र भीषण रूप धारण केल्याने ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागत होती त्यामुळे आगीची व्याप्ती वाढल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कल्याण व ठाणे येथील प्रत्येकी एक अशा चार फायर फायटर गाड्यांनी स्थानिक पाण्याच्या टँकर च्या मदतीने हे आग सात तासांनी आटोक्यात आणली.
          या आगीच्या ज्वालांनी या गोदाम इमारतीचा मागील संपूर्ण हिस्सा मागील बाजूस असलेल्या सुशांत चौधरी यांच्या चाळीवर कोसळला त्यामुळे चाळीतील दोन खोल्यांचे नुकसान झाले असून एक दुचाकी मातीच्या ठिगाऱ्या खाली गाडली गेली.
           पुर्णा ग्रामपंचायत व नारपोली पोलीस यांच्या मदतीने घटनास्थळी आग विझविण्यासाठी खाजगी टँकर च्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिल्याने आग आटोक्यात आणण्यास जवानांना यश मिळाले आहे. नारपोली पोलिसांनी या बाबतीत नोंद घेऊन चौकशी सुरू केली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ करीत आहेत.

No comments:

Post a Comment

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !!

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : पोसरी ठाकूरवाडी येथील रायगड जिल्हा प्राथमि...