Thursday, 15 September 2022

प्रवीण कावणकर भूमीपुत्राने घातली काव्यलेखणीतून साद कुणबी समाज संघटना कोतळूक, मुंबई आयोजित नाटकाला उपस्थित राहण्याचे केले आवाहन !!

प्रवीण कावणकर भूमीपुत्राने घातली काव्यलेखणीतून साद कुणबी समाज संघटना कोतळूक, मुंबई आयोजित नाटकाला उपस्थित राहण्याचे केले आवाहन !!


*[ निवोशी/गुहागर: उदय दणदणे ]*

गुहागर तालुक्यात सामाजिक ,आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सार्वजनिक विकास उपक्रमात अग्रेसर असणारी संस्था *कुणबी समाज संघटना कोतळूक, मुंबई* ता. गुहागर सांस्कृतिक सेलच्या वतीने संस्थेच्या आर्थिक उन्नती मदतीकरीता सहभाग गुहागर तालुकासह कोतळूक वासीय हितचिंतक, मित्रमंडळी, यांच्या मनोरंजनार्थ रविवार दिनांक-२५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वा. शिवाजी मंदिर दादर मुबंई येथे सदाशिव चव्हाण लिखित दोन अंकी धमाल विनोदी नाटक " प्रेमाचा गोलमाल " या नाटकाचे आयोजन करण्यात आले असून सदर नाटकाला तमाम बंधू- भगिनी कलाप्रेमींनी उपस्थित राहण्या प्रति कोतळूक गावातीलच एक उमदा कवी-कु. प्रवीण गोविंद कावणकर याने अल्पवधीतच विविध विषयावर काव्य लेखन करून समाजप्रबोधन केले आहे. आज मात्र गावातील आपल्या हक्काच्या संस्थेने हाती घेतलेल्या सामाजिक उपक्रम आयोजित नाटकाला संकल्पित होऊन उदंड अशी उपस्थिती लाभावी या बहुउद्देशीय आपल्या काव्य लेखणीतून आवाहन करत आहेत....

शीर्षक : कुणबी समाज कोतळूक गुहागर

आम्ही कुणब्यांची लेकरे
रुजवू मनात बांधिलकी
जात हिंदू तिलोरी कुणबी
एकजूटीने टिकवू माणूसकी.!!

जशी करता देवाधर्माची भक्ती
जाणून घ्यावी समाजाची युक्ती
शेतकरी माझा बळीराजा 
संघर्षासाठी खेळावी लागते कुस्ती...!! 

बरसत्या पावसाळी मोसमात
दोन अंकी नाटकाचा प्रयोग 
प्रेमाच्या बंधनात गोलमाल
ठरला प्रेमींचा रंगतदार योग....!!!

कुणबी समाज आमचा
मराठी संस्कृती परंपरेचा
मातीत जन्मलेल्या भूमीचा           
अभिमान बाळगतो महाराष्ट्राचा!!!

पाहायला विसरू नका
माझ्या प्रेमी बांधवांनो
येताय ना मग बघायला
छत्रपती शिवाजी मंदिरला मित्रांनो...!!

*कवी : प्रविण गोविंद कावणकर*- मु.पो. कोतळूक ता गुहागर जि रत्नागिरी
मो : ९७६३०५४७१५

सदर कार्यक्रमाच्या व नाटक प्रयोगाच्या अधिक माहितीसाठी- रवींद्र बाधवटे-८८९८२४३८५८ सुरेश दवंडे-९१६७२१०७७१ संतोष भेकरे-९७६९४५१२३९ संजय आगीवले-९८३३१९८१११ यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !!

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : पोसरी ठाकूरवाडी येथील रायगड जिल्हा प्राथमि...