Thursday, 15 September 2022

भिवंडीत चोरलेले इअरफोन विक्रीसाठी आलेल्या सलमान खानला नारपोली पोलिसांनी केली अटक !!

भिवंडीत चोरलेले इअरफोन विक्रीसाठी आलेल्या सलमान खानला नारपोली पोलिसांनी केली अटक !!


भिवंडी, दिं,१६, अरुण पाटील (कोपर) :
       भिवंडीतील गोदाम पट्टयातील एका गोडामाचे अज्ञात चोरट्यानी छताचे पत्रे तोडून आतील इअरफोनचे बंडल चोरी करून ते दिल्लीचा रहिवाशी असलेल्या एका आरोपीला विकण्यास दिला असता पोलिसांनी सापळा रचून मोठ्या त्यास अटक करून त्याच्या कडून साडेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.सलमान हारून खान (वय ३२ रा.दिल्ली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
       सविस्तर हकीगत अशिकी, भिवंडी शहरात वाहन चोरी घटनान बरोबरच ग्रामीण भागातील गोदाम पट्ट्यात चोरी, घरफोडीच्या घटना वारंवार घडत असतात.अश्याच प्रकारे दिं,३ सप्टेंबर रात्री ते ४ सप्टेंबर पहाटे दरम्यान गोदाम पट्टयातील पूर्णागाव येथील द्रौपदीछाया कंपाउंड मधील मौर्या बिल्डिंगच्या समोरील भगवती गोदामाच्या छताचा पत्रा तोडून त्यावाटे आत प्रवेश करून गोदामातून १० लाख ८९ हजार रुपये किंमतीचे इअरफोनचे एकूण ३३ बंडल कार्टून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. या प्रकरणी गोदाम मालक भरतभाई रोनाभाई चौधरी यांनी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
         या गुन्ह्याच्या तपास नारपोली पोलीस ठाण्याचे वपोनि श्री.मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि श्री.चेतन पाटील यांनी तपास सुरू केला असता, सदर तपासात श्री.चेतन पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत सलमान खान हा दुसर्यांनी चोरी केलेल्या इअरफोनचे सॅम्पल दाखवण्याकरिता भिवंडी शहरातील अंजुर फाट्यावर येणार असल्याची माहिती मिळाली.
         त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक राजेश वाघमारे, पोलीस निरीक्षक संभाजी जाधव,पोलीस हवालदार जयराम सातपुते, सुशिल इथापे, नंदकिशोर सोनगिरे, राजेश पाटील, पोलीस नाईक संदीप जाधव, जनार्दन बंडगर, विजय ताटे या पोलीस पथकासह सापळा रचून मोठ्या शिताफीने सलमानला ताब्यात घेऊन अटक केली.
         पोलिसांनी आरोपी सलमान खानकडून १० लाख ८९ हजार रुपयांचे इअरफोनचे तब्बल ३३ बंडल कार्टून जप्त केले. सलमान हा मूळचा दिल्ली येथील रहिवासी आहे. तो भिवंडीत स्क्रॅपचा माल खरेदी करून नफ्यामध्ये विक्रीचे काम करत आहे. तर त्याने सदरचा माल हा चांदबाबू बरखास हुसेन (रा.मुंबई) याच्याकडून खरेदी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नारपोली पोलीस गुन्ह्यातील सलमानच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.

No comments:

Post a Comment

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !!

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : पोसरी ठाकूरवाडी येथील रायगड जिल्हा प्राथमि...