Sunday, 11 September 2022

मानमोहाडी गावच्या गरोदर महिलेची रस्त्यातच प्रसूती ! "रस्त्याअभावी डोलीतुन करावा लागतो प्रवास"

मानमोहाडी गावच्या गरोदर महिलेची रस्त्यातच प्रसूती !

"रस्त्याअभावी डोलीतुन करावा लागतो प्रवास"


जव्हार- जितेंद्र मोरघा :

      आज आपला देश एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असला तरी आज हि पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील कित्येक अतिदुर्गम आदिवासी पाडे शासनाच्या पायाभूत सोयी सुविधांपासुन कासो दूर असल्याचे चित्र जव्हार तालुक्यात पाहावयास मिळत आहे. आजही काही आदिवासी दुर्गम पाड्यांपर्यत रस्ते पोहचलेले नाहीत, तेथील आरोग्य यंत्रणा हि व्हेंटिलेटर वर असल्याने आरोग्य यंञणेचा पुरता बोजवारा उडाला आहे.या पायाभूत सुविधांअभावी आदिवासी बांधवाना हाल सोसावे लागत आहेत. अशीच दुर्दैवी वेळ मनमोहाडीतील गरोदर महिलेवर ओढवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 
      जव्हार तालुक्यातील ऐना ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मनमोहाडी येथील अंजनी राजेश पारधी.(वय-२१) ह्या गरोदर मातेला गावात रस्ता नसल्याने डोलीच्या साहाय्याने गावातील तरुणांनी रात्री तीन वाजेच्या सुमारास डोंगरदऱ्यांची पायवाट तुडवत दवाखान्यात नेत असताना अर्ध्या वाटेत महिलेची प्रसूती झाली. रस्त्याअभावी मनमोहाडी गावात वाहन पोहचत नसल्याने गरोदर महिलांची,रुग्णांची हेळसांड होत आहे.
     सध्या जव्हारच्या पतंगशहा कुटीर रुग्णालयात ह्या गरोदर महिलेला दाखल करण्यात आले आहे. ह्या मातेची हि पहिलीच खेप असल्याने तिला शनिवारी राञी एकाएकी प्रसुती वेदना सुरू झाल्याने तिला झोळीतुन मनमोहाडी ते झाप हे ५ कि. मीटर अंतर नेत असताना वाटेतच ह्या मातेची प्रसुती होऊन तिने गोंडस कन्येला जन्म दिला आहे.  

      "मनमोहाडी ग्रामस्थ रस्त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पाठ पुरावा करीत आहेत.शासनाकडून फॉरेस्ट परवानगी मुळे निधी देता येत नाही,असे सांगण्यात येत होते परंतु आता ते पण आम्ही दोन-तीनदा प्रस्ताव फॉरेस्ट ची परवानगी घेतली आहे. आता तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्त्याचा प्रश्न सोडवावा.जेणेंकरुन आदिवासी बांधवांचे हाल होणार नाहीत"

एकनाथ दरोडा, (बहुजन विकास आघाडी जव्हार पालुका अध्यक्ष )

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...