आमदार कुमार आयलानी यांच्या म्हारळ, कांबा येथील लोकोपयोगी कामांचे कांबा पदाधिकाऱ्यांकडून स्वागत व आभार !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील आणि उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या म्हारळ आणि कांबा या गावातील विविध लोकोपयोगी विकास कांमाचे उद्घाटन नुकतेच आमदार कुमार आयलानी केले होते. ते नुकतेच कांबा गावात गणपती बापाच्या दर्शनासाठी आले असता गावातील मा. सरपंच मंगेश बनकरी व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत आणि कौतुक केलं.
कांबा ग्रामपंचायत हद्दीतील टाटा पावरहाऊस जवळ असणारा तलाव हा गेली कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिला होता, यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे, कचरा, घाण, वनस्पती वाढलेल्या असल्याने याची अवस्था बिकट झाली होती. त्यामुळे याचे सुशोभीकरण व्हावे अशी मागणी कांबा ग्रामपंचायतीचे मा. सरपंच मंगेश बनकरी, सदस्य मधुकर सुरोशे, देवराम सुरोशे, आदी पदाधिका-यांनी केली होती. याची दखल आमदार कुमार आयलानी यांनी घेऊन या तलावाचे सुशोभीकरणाचे उद्घाटन नुकतेच त्यांनी केले होते. त्यामुळे गावातील पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आंनद झाला होता.
आमदार कुमार आयलानी हे नुकतेच कांबा गावातील बाप्पाच्या दर्शनासाठी मंगेश बनकरी यांच्या घरी आले होते. यावेळी मधुकर सुरोशे, अरुण तुर्भेकर, संजय भोईर, विनायक बनकरी, आतूल गायकर, चित़ामण चौधरी, राजेश बनकरी, अमर बनकरी, एकता मित्र मंडळाचे रामू देवकर, उपाध्यक्ष दिपक उबाळे, दोस्ती ग्रुपचे अध्यक्ष, हरदास सवार,शिवानंद मनाडी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी केलेल्या लोकोपयोगी विकास कामांच्या उद्घाटनाबद्ल मा. सरपंच मंगेश बनकरी व पदाधिकाऱ्यांनी आमदार आयलानी यांचे आभार मानले.




No comments:
Post a Comment