कल्याण डोंबिवली परिसरातील नामांकित पत्रकार ज्ञानेश्वर मुंडे यांच्या मातोश्री कै. शेवंताबाई मुंडे यांचे प्रथम पुण्यस्मरण, विविध कार्यक्रमाचे आयोजन !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण डोंबिवली परिसरातील नामांकित पत्रकार तसेच आपले शहर वृत्त वाहिनी व आपले शहरनामा वृतसमुहाचे संचालक ज्ञानेश्वर मुंडे तसेच नरेश मुंडे यांच्या मातोश्री कै. सौ. शेंवताबाई बाबू मुंडे यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने विविध सामाजिक, लोकोपयोगी, समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवा आगासन गावातील सामाजिक कार्यकर्ते बाबू मुंडे यांच्या पत्नी तसेच कल्याण डोंबिवली परिसरातील नामांकित पत्रकार तसेच आपले शहर वृतवाहिनी व शहरनामा वृत्तपत्र समूहाचे संचालक ज्ञानेश्वर मुंडे, नरेश मुंडे, सुनील मुंडे यांच्या मातोश्री कै. सौ. शेवंताबाई मुंडे यांचे प्रथम पुण्यस्मरण उद्या म्हणजे सोमवारी १९ सप्टेंबर रोजी आहे, या निमित्ताने प्रसिद्ध किर्तनकार ह. भ.प जयेश महाराज भाग्यवंत (आंबेगाव) यांचे श्री हरी किर्तन आयोजित केले आहे. यासह दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित केला आहे.
गेल्या वर्षी कै. सौ. शेवंताबाई बाबू मुंडे यांचे अचानक निधन झालं होतं. त्यामुळे मुंडे कुंटूबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. सर्व कुंटूबावर अपार माया व प्रेम करणाऱ्या आईचे असे निघून जाण्याने दिवा आगासन परिसरात शोककळा पसरली होती. त्यामुळे त्यांची सदैव आठवण राहावी म्हणून त्यांचे पुत्र ज्ञानेश्वर, नरेश, सुनील मुंडे व वडील बाबू मुंडे यांनी वर्षभर विविध समाज उपयोगी,लोकोपयोगी, जनहितार्थ कामे केली, गोरगरीब, आदिवासी, कष्टकरी, मजूर, अनाथ यांना अन्नदान, कपडे वाटप, ५०० बँल्केट, २०० बेडशीट, ५० बेंच, आदी साहित्य वाटत केले.
याशिवाय विविध प्रकारच्या सामन्यासाठी ९० ट्रॉफीज, ५ सायकली, घड्याळ, टि शर्ट, इत्यादी वस्तू देखील वाटत करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय सायकलपटू विनोद पुनामिया, तसेच प्रसिद्ध गायक संतोष चौधरी (दादूस) आदी मान्यवर उपस्थित होते. त्यामुळे आज होणारा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम देखील विविध लोकोपयोगी कार्यक्रमाने साजरा होणार आहे.




No comments:
Post a Comment