वडगाव कोल्हाटी येथे आम आदमी पार्टीचा प्रवेश सोहळा संपन्न...
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २५ : शनिवार दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा शहर कार्याध्यक्ष मा. रघुनाथदादा पाटील यांनी औरंगाबाद तालुका येथील वडगाव कोल्हाटी येथे कार्यकारिणीचा विस्तार व प्रवेश कार्यक्रम ठेवला होता, यावेळी औरंगाबाद तालुका अध्यक्ष जनार्धन साबळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संभाजी तौर, ञानेश्वर बडे, किशोर भाऊ दांडगे, दयानंद चव्हाण, आनंद घोडेकर, योगेश सरोवर, चेतन चौधरी, अरुण राठोड,ज्ञानेश्वर गोपदर, संदीप राव सातपुते, रवी डोंगरे, शिवाजी राऊत, रामेश्वर पाटील, अनिल शेवाळे, विशाल वाघमारे, अक्षय बोंदे, सचिन पावरा, विलास गायकवाड, आदिनाथ, भारती चव्हाण ताई, अमृता ताई डोंगरे, राठोड ताई , भास्कर चांदर, सुदाम शिंदे, अशोक गायकवाड, प्रताप बिरादार, हंसराज रेवस्कर, सुरज घोडके, अंबादास शिंदे, गट नंबर ७ मथुरानगरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचायत समिती गण जिल्हा परिषद सर्कल व बूथ लेवल ला जवळजवळ ४० ते ५० पदाधिकाऱ्यांना प्रवेश देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आम आदमी पार्टीची जिल्हा कार्यकारणी प्रचार समिती पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते यामध्ये मराठवाडा विभागीय सदस्य मा. सदाशिव पाटील, यांच्यासह जिल्हा सचिव संजय नागरे, जनसंपर्क प्रमुख प्रवीण हिवाळे, जनसंपर्कप्रमुख , युवा जिल्हाध्यक्ष आशिष शिसोदे, पक्षाचे नेते प्रकाश जाधव, प्रसिद्धीप्रमुख इम्रान भाई बिल्डर, सदस्य आशाताई सावळे, वार्ड अध्यक्ष देविदास लहाने, वार्ड अध्यक्ष प्रवीण पालवे, विकास पागोरे, रोहित पागोरे, समाधान बावस्कर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर हे ही प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक औरंगाबाद तालुका अध्यक्ष जनार्धन साबळे पाटील यांनी केले, व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्कप्रमुख प्रवीण हिवाळे यांनी केले, यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की, औरंगाबाद तालुक्यामध्ये बूथ कमिटी नेमणुकीचे काम सर्वप्रथम हाती घ्यावे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आपण आंदोलन च्या माध्यमातून लढा उभा करावा असे नमूद केले, येणाऱ्या सर्व निवडणुका आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने लढवणार असे यावेळी नमूद केले सर्वात शेवटी जनार्धन साबळे पाटील यांनी आभार व्यक्त केले व भारत माता की जय या घोषणा देऊन कार्यक्रम ची सांगता करण्यात आली

No comments:
Post a Comment