Saturday, 24 September 2022

आज दादर येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा !

आज दादर येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा !


मुंबई - ( दिपक कारकर ) : शिक्षण हे काळाची गरज असणारे उपयुक्त माध्यम आहे. उद्याचं देशाचं भविष्य असणारा विद्यार्थी खऱ्या अर्थाने शैक्षणिक प्रवाहातूनच घडत असतो.म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांना शाबासकी देण्याच्या प्रयत्नांतून पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई ( करजुवे, धामापूर, पेढांबे, भातगाव, पिरंदवणे ) आयोजित शैक्षणिक वर्षे - २०२१-०२२ मधील इयत्ता दहावी, बारावी, पदवीधर विद्यार्थी- विद्यार्थीनी यांचा गुणगौरव सोहळा कित्ते भंडारी सभागृह, गोखले रोड, सेनाभवन जवळ,दादर ( प.) मुंबई - ४०००२८ येथे आज रविवार दि.२५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २ वा.३० मि. आयोजित केला आहे. पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थी-पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...