भाडेकरूंच्या गैरकृत्यांबाबत घरमालकास दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार !
या कारवाई विरोधात घरमालकाने मुंबई उच्च् न्यायालयात याचिका दाखल करून ही कारवाई चुकीची आणि अयोग्य असून कारवाई रोखा अशी विनंती केली होती. या याचिकेवर न्यायामूर्ती नितीन जामदार आणि न्यायामूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी घरमालकाच्या वतीने आपण आपले घर भाड्याने दिले होते. त्या घरात सुरू असलेल्या गैरकृत्यांबाबत कोणतीही गोष्ट माहिती नव्हती. तसेच, या कारवाई नंतर त्यांच्याशी लिव्ह अँड लायसन्स करार रद्द करून त्या जागेचा ताबा घेतला आहे होता असा युक्तिवाद केला गेला.
पण घर भाड्याने दिल्यानंतर त्या घरात घडणार्या अनधिकृत, बेकायदेशीर कृत्य आणि घटनांची जबाबदारी घर मालक या नात्याने नाकारता येणार नाही, असे मत स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील घरमालकाला दिलासा देण्यास नकार दिला.

No comments:
Post a Comment