Tuesday, 13 September 2022

"जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थे"च्या वतिने १२४ जणांना ई श्रम कार्ड व ६० लोकांना आरोग्य कार्ड काढुन देण्यात आले

"जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थे"च्या वतिने १२४ जणांना ई श्रम कार्ड व ६० लोकांना आरोग्य कार्ड काढुन देण्यात आले


वसई, बातमीदार : संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक व सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असणारी "जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था" ही सर्व सामान्यांकरिता नेहमीच विविध कार्यक्रम करत असते, तसेच आवश्यक तिथे गरजवंताला आधार सुध्धा देते.


अशा या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने  दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी समाज मंदिर म्हस्किन, म्हास्किन पाडा वसई यथे ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन केले होते. या शिबीरा अंतर्गत १२४ जणांना ई श्रम कार्ड काढणं देण्यात आले व ६० जणांना हेल्थ कार्ड ( आरोग्य कार्ड ) काढून देण्यात आले.


याप्रसंगी म्हस्किन गावचे सरपंच पद्माकर रामचंद्र तुंबडा, जिजाऊ संस्थेच्या वसई तालुका प्रमुख हर्षाली चंद्रकांत खानविलकर, जिजाऊ स्वयंसेविका उन्मीका उमेश घरत उपस्थित होत्या. लाभार्थ्यांनी शिबिराबाबत आभार व्यक्त केले व असे लोकोपयोगी शिबीर होत राहावेत अशी विनंती केली.



No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...