Tuesday, 13 September 2022

महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन ओडीसा यांच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा समाज सेवा रत्न गौरव पुरस्कार व मानद डॉक्टरेट उपाधी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान!

महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन ओडीसा यांच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा समाज सेवा रत्न गौरव पुरस्कार व मानद डॉक्टरेट उपाधी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान! 


डोंबिवली दि. १३ (स्व.रा.तो) :
महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन भुवनेश्वर ओडीसा, निती आयोग पुरस्कृत, आय.एस.ओ ९००१ प्रमाणित नामांकन पात्र, संस्थेच्या माध्यमातून महात्मा गांधी ग्लोबल पीस फ्लोरिडा युनिव्हर्सिटी, USA तर्फे विविध क्षेत्रातील व्यक्तींचा त्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक, आध्यात्मिक, कार्यातील व उद्योजक क्षेत्रातील कार्यकौशल्याचा गौरव म्हणुन अनेक व्यक्तींचा यथोचित मानसन्मान सोहळा कार्यक्रम मानद डॉक्टरेट ही उपाधी व "समाज सेवा रत्न गौरव" पुरस्कार २०२२ देऊन बुधवार दि. १३/०९/२०२२ रोजी कामा असोसिएशन सभागृह,डोंबिवली पूर्व, एम.आय.डी.सी, फेज, १, येथे मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात विविध मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. 


यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री.उमाजी यादोराव बिसेन (अध्यक्ष कुलपती- महाराष्ट्र पर्यटन भूषण आंतरभारतीय शिक्षण संशोधन विद्यापीठ), न्यायमूर्ती बाल हक्क संरक्षण डॉ. संदेश शिरसाठ, ह.भ.प. डॉ. विश्वासराव आरोटे सरचिटणीस- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, डॉ. सोन्या काशिनाथ पाटील अध्यक्ष-समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य, बी.एन.एन. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाघ, डॉ.मनीलाल रतिलाल शिंपी राजदूत (M.G.G.P.F), डॉ. किशोर बळीराम पाटील डायरेक्टर (M.G.G.P.F) तथा संपादक- दैनिक स्वराज्य तोरण, डॉ. देवेन सोनी कामा असोसिएशन, डॉ. राजू भाई बैलूर कामा असोसिएशन, पालघर जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. कृष्णा माळी, शिवनगर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. सुनील पाटील, भिवंडी मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. किशोरी भगवान ठाकूर श्री.अशोक उगले अकोले तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, श्री.मच्छिंद्ध आवारी संचालक अकोले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था अकोले, श्री.संदीप मोरे.उद्योजक अगस्ती स्विट उद्योग व आदी मान्यवर उपस्थितीत होते, कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा गांधी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे राजदूत डॉ. मनीलाल रतिलाल शिंपी यांनी केले, सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमात ज्यांचा सन्मान होणार आहे त्या सर्वांचे अभिनंदन करतो,व आयोजकांचे आभार मानतो, त्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम हा खरोखर कौतुकास्पद आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते त्याचप्रमाणे शासनाच्या अनेक योजना आहेत त्यासाठी पाठपुरावे करावे लागतात, आपण पर्यटन अथवा कोणत्याही योजने साठी माझ्याकडे अर्ज करा मी तुम्हाला सहकार्य करीन असे अध्यक्षीय भाषणात कुलपती उमाजी बिसेन यांनी सांगितले, बालकांचे संरक्षण व संगोपन कसे करावे याबाबत इतंभूत माहिती न्यायमूर्ती संदेश शिरसाट यांनी यावेळी दिली. 
बालकांचे संरक्षण व संगोपन कसे करावे याबाबत इतंभूत माहिती न्यायमूर्ती संदेश शिरसाट यांनी यावेळी दिली. 


कोणतेही क्षेत्र असू दे प्रत्येक क्षेत्रात अडचणी असतातच त्यामुळे अनेक अडचणींना मात करून २२ वर्षे खडतर प्रवास करून पत्रकार क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने अनेक उपक्रम राबवित आहोत, मागील महिन्यातच मला अमेरिका युनिव्हर्सिटी च्या वतीने मानद डॉक्टरेट उपाधी मिळाली त्याचा सार्थ अभिमान वाटला, पिकते तिथे विकत नसते मात्र याची जाणीव उशिरा का होईना माझ्या कर्मभूमीतील, जन्मभूमीतील नागरिकांना झाली व त्यांनी माझा विविध ठिकाणी सन्मान केला, यापेक्षा आनंद कोणताच नाही, त्यामुळे डॉ.किशोर पाटील व डॉ.मनीलाल शिंपी यांचे मी मनापासून आभार मानतो असे यावेळी डॉ. विश्वासराव आरोटे यांनी सांगितले, आम्ही डॉक्टरेट मिळविण्यासाठी पाच वर्ष एखाद्या विषयावर पीएचडी करतो, मात्र या ठिकाणी ३०/४० वर्ष काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा मानद डॉक्टरेट उपाधी देऊन सन्मान करण्यात येत आहे हे पाहून आनंद वाटला कारण आमच्यापेक्षा त्यांनी अनेक वर्ष विविध क्षेत्रात कामे केली आहेत अशा व्यक्तींचा सन्मान आमच्या पदवीपेक्षा मोठा आहे असं मला वाटते त्यामुळे त्यांची उपाधी ही एक पदवीच आहे असं म्हणायला वावग ठरू नये असे मला प्रामाणिकपणे वाटते अशे यावेळी भिवंडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. 
मानद डॉक्टरेट उपाधी व समाज सेवा रत्न गौरव पुरस्कार हा शिक्षण क्षेत्रामधून पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री. विजय पांडुरंग जाधव, शासकीय कृषी विभागा मध्ये काम करणारे श्री. यशवंत अनंत म्हात्रे, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात काम करणारे श्री, श्री. भगवान ठाकूर, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे श्री. प्रकाश देवळीकर, कुस्ती व सामाजिक क्षेत्रात काम करणारे श्री.विनोद पाटील, त्याचप्रमाणे शिक्षण विभागात काम करणारे श्री. बापू जगन्नाथ शिंपी, संस्थेच्या माध्यमातून काम करणारे श्री. नितील चंदय्या,श्री. निलेश नागडा, श्री. गोपाल भाई राठोड, श्री. संजीव काटेकर, श्री. बाबजी चौधरी, श्रीमती शशिकलाबेन शेट्टी यांचा समावेश आहे.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांनी केले. संपूर्ण सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे डायरेक्टर तथा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील यांनी केले 

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...