Friday, 11 November 2022

ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा प्रचार धुमधडाक्यात सुरू शिक्षकांचा आमदार शिक्षकच पाहिजे - शिक्षकांनी व्यक्त केला निर्धार

ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा प्रचार धुमधडाक्यात सुरू
शिक्षकांचा आमदार शिक्षकच पाहिजे - शिक्षकांनी व्यक्त केला निर्धार


उल्हासनगर / ठाणे : दि.११ (वृत्तसेवा) - उल्हासनगर शहरामध्ये महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा कोकण शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा प्रचार काल धुमधडाक्यात सुरू झाला. 'शिक्षकांचा आमदार शिक्षकच पाहिजे', असा निर्धार सर्व शिक्षकांनी यावेळी व्यक्त केला.
     उल्हासनगर शहरातील सर्व शाळांनी ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे स्वागत करून त्यांच्या प्रचार दौऱ्याला उदंड प्रतिसाद देत 'शिक्षकांचा आमदार शिक्षकच झाला पाहिजे. आमच्या मनातील आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर हेच आहेत. मागच्या निवडणुकीत निवडून आलेल्या विद्यमान आमदारांना आम्ही पाहिलेलंही नाही. ते शिक्षक नसल्याने त्यांना शिक्षकांच्या व्यथा माहित नाहीत. यापुढे शिक्षक नसलेल्या उमेदवाराला आमच्या शाळेत प्रचार करायला आल्यास त्यांना त्यांची जागा दाखवू', अशा भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या. तसेच यावेळी शिक्षक कोणत्याच आमिषाला बळी पडणार नाहीत. आमच्यासाठी काम करणारा एकच माणूस! ते म्हणजे ज्ञानेश्वर म्हात्रे! ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी हजारो शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामे केलेली आहेत. अशा माणसाला शिक्षकांच्या भल्यासाठी, शाळा वाचल्या पाहिजेत, शिक्षक वाचले पाहिजेत आणि आपलं अस्तित्व टिकवलं पाहिजे म्हणून निवडून दिले पाहिजे असा निश्चय अनेक शिक्षकांनी व्यक्त केला.
     प्रचारासाठी शिक्षण क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष गवळी सर, मुख्याध्यापक संघटनेच्या साळुंखे मॅडम, जाधव मॅडम, मुख्याध्यापक संघाचे सहसचिव प्रवीण लोंढे, ज्युनिअर कॉलेज शिक्षक सेनेचे उपाध्यक्ष दीपक पाटील, उल्हासनगरचे कोषाध्यक्ष भामरे सर व सहसचिव समाधान कुवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...