Friday, 11 November 2022

काँग्रेस पार्टी हिंदू धर्मविरोधी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले - शहर अध्यक्ष शिरीष बोराळकर

काँग्रेस पार्टी हिंदू धर्मविरोधी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले - शहर अध्यक्ष शिरीष बोराळकर


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ११ : काँग्रेसच्या राजकीय प्रवास हा हिंदू धर्मविरोधी कारवाया करण्या साठी प्रसिद्ध आहे, हिंदूंचा अपमान करण्यासाठी व हिंदू देवतांबद्दल हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे हेच काँग्रेसचे नेत्यांचे धोरण आहे, त्या मध्ये ते कधी स्वतंत्रवीर सावरकरांचा अपमान करतात, तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल देखील काँग्रेसचे नेते सतीश जारकीवली यांनी अभद्र आशी भाषा वापरली.

या मुळे महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांच्या जनभावनेचा अपमान होईल असे वक्तव्य काँग्रेस नेते सतत करत असतात, काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही भारत जोडेयात्रा नसून , भारत तोडो यात्रा आहे, या यात्रे मध्ये सतत विविध धार्मिक देवी देवतांचा महापुरुषांचा अपमान होईल असेच कार्य, यात्रे मधून केले जात आहे, तसेच (उठा) गटाचे नेते या यात्रे मध्ये आदित्य ठाकरे हे सहभागी होत आहे, याचा अर्थ असा होतो की स्वतंत्र्यवीर सावरकरांचा व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान काँग्रेस जो सतत अपमान करत आहे तो उद्धव ठाकरे यांच्या गटाला मान्य आहे, हे या वरून सिद्ध होते की उद्धव ठाकरे गट ढोंगी हिंदुत्वाचा बुरखा पांघरलेला गट आहे, त्यांचे हिंदुत्वाचे धोरण हे ढोंगी आहे, तसेच हिंदूंचा अपमान जे काँग्रेस नेते करत आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे यांचा गट बसतो, असा देखील आरोप भाजप शहर अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी केला, या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे कर्नाटकचे नेते सतीश जारकीवली यांचा पुतळा जाळतांनी पोलिसांची व कार्यकर्ते यांची झटापट झाली, कार्यकर्त्यांनी सतीश जारकीहोली यांच्या फोटोला चपलांनी बुटानी मारहाण केली व हिंदूंचा अपमान सहन केला जाणार नाही, अशा देखील घोषणा या वेळी देण्यात आल्या, जो हिंदू हित की ,बात करेगा, वही देश पे राज करेगा, नही चलेगी नही चलेगी ताना शाही नही चलेगी, या प्रकारच्या घोषणा कार्यकर्ते देत होते, या वेळी प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, बापू घडामोडी, अनिल मकरिये, जिल्हा सरचिटणीस समीर राजूरकर, शिवाजी दांडगे, राजू शिंदे, जालिंदर शेंडगे, दिलीप थोरात, विकास कुलकर्णी, प्रशांत देसरडा, दयाराम बसये बंधु, ज्ञानोबा मुंडे, रामेश्वर भादवे, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस सविता कुलकर्णी, माधुरी आदवंत, लता दलाल, मनीषा मुंडे, अमृता पालोदकर, दिपक ढाकणे, राहुल चौधरी, आशोक दामले, हर्षवर्धन कराड, मनोज भारस्कर, अरविंद डोणगावकर, अजय शिंदे, बबन नरवडे, योगेश वाणी, सागर नीलकंठ, जगदीश सिद्ध, मुकुंद दामोधरे, रेखा जैस्वाल, वर्षा साळुंखे, महेश माळवतकर, मयुर वंजारी, कुणाल मराठे, सिद्धार्थ साळवे, संजय चौधरी, लक्ष्मीकांत थेटे, संजय जोशी आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...