Friday, 11 November 2022

माणुसकी समुहाच्या साहाव्या वर्धापनदिना निमित्ताने राज्यस्तरीय "सेवा गौरव" पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन...

माणुसकी समुहाच्या साहाव्या वर्धापनदिना निमित्ताने राज्यस्तरीय "सेवा गौरव" पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन...


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ११ - सालाबाद प्रमाणे याही वर्षी सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या व माणुसकी समुहाच्या साहाव्या वर्धापन दिनानिमित्त समाजातील तळागाळातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दात्यांचा सामाजिक बांधिलकी म्हणुन सेवा- गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.यात विषेश ११ व्यक्तींना पुरस्कार व सामाजिक कार्य, आरोग्य सेवक, महाराष्ट्र पोलीस, आदर्श शिक्षक, क्रीडा, युवा उद्योजक, कृषी भुषण, कवी, भारुडरत्न तथा शाहिर, अशा ३१ पुरस्काराची निवड केली जाणार आहे. आदीनीं सेवा गौरव पुरस्कार साठी आपले प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन संस्थापक, संस्थेच्या कमीटी मंडळाने केले आहे.

सेवा गौरव पुरस्कारांमध्ये सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, एक पुस्तक आणि शाल श्रीफळ,एक वृक्ष देऊन गौरविले जाणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी एका दिमाखदार सोहळ्यात शासकीय, मान्यवरांच्या शुभहस्ते सेवा गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

तरी महाराष्ट्र राज्यातील आदर्श व्यक्तीमत्वानी आपले विहीत नमुन्यातील प्रस्ताव तयार करुन दि.०३ डिसेंबर २०२२ पर्यंत खालील दिलेल्या पत्यावर पाठवावे. प्रस्ताव पाठविल्यावरच निवड समिती निवड जाहीर करतील...

पत्ता :- समाजसेवक सुमित पंडित संस्थापक अध्यक्ष, सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्ण सेवा समुह, शासकीय वैद्यकीय रुग्णलय घाटी औरंगाबाद. प्लाॕट 60, हरी ओम नगर जटवाडा रोड हर्सुल औरंगाबाद, ता.जि. औरंगाबाद पिनकोड 431001

मो. 07588928822

प्रस्ताव नमुना

(१) संपूर्ण नाव:-

(२)जन्म दिनांक:-

(३)लिंग. :-

(४)संपूर्ण पत्ता. :-

(५)मोबाईल क्र. :-

(६)कार्यरत असलेल्या कार्यालयाचे नाव:-

(७)कोणत्या पदावर कार्यरत आहे :-

(८)कार्यरत असल्यास पदावरील अनुभव:-

(९)यापूर्वी मिळालेला विशेष पुरस्कार :-

(१०) आपले उल्लेखनीय कार्य लेखी स्वरुपात :-

(वरील नमुन्यात आपली संपूर्ण माहिती पासपोर्ट फोटो सह दिनांक ०३ डिसेंबर पूर्वी आमच्या कार्यालयात अथवा उपरोक्त व्हॉटसअप क्रमांकावर पाठवावे. 07588928822)

No comments:

Post a Comment

नवनिर्माण महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.संतोष खरे यांना पीएच.डी.पदवी प्रदान !!

नवनिर्माण महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.संतोष खरे यांना पीएच.डी.पदवी प्रदान !! मुंबई (शांताराम गुडेकर)           ...