Friday, 11 November 2022

मी पळून जाणारा माणूस नाही, कोणत्याही गोष्टीला सामोरा जातो - विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार

मी पळून जाणारा माणूस नाही, कोणत्याही गोष्टीला सामोरा जातो - विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार 


मुंबई, अखलाख देशमुख, दि ११ : राज्यात मागील काही दिवसांपासून राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याबाबत जी चुकीची प्रतिमा दाखवण्यात येत आहे त्या गोष्टीला स्वत: अजितदादांनी आपल्या शैलीत पूर्णविराम दिला आहे. मी पळून जाणारा माणूस नाही, कोणत्याही गोष्टीला सामोरा जाणारा माणूस आहे अशा शब्दात त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर अजितदादा पवार त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही असा लागणारा सूर त्यांना अजिबात पटलेला नाही. या घडामोडींवर बोलण्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेतली जाईल, असे अजितदादांनी माध्यमांना सांगितले. 

पुढे अजितदादा म्हणाले की, ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत मी बाहेरगावी होतो. कोणत्याही गोष्टीची माहिती न घेता बातम्या चालवण्या ऐवजी माझ्या कार्यालयाशी संपर्क साधला असता तर त्याची माहिती मिळाली असती, अशा शब्दात अजितदादांनी माध्यमांची कानउघडणी केली. या काळात माझी बदनामी करून जनमानसात प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

मुलाच्या अपघाताचा धसका अन् आईने जीव सोडला, माय-लेकाचं प्रेम पाहून सारं हळहळलं..

मुलाच्या अपघाताचा धसका अन् आईने जीव सोडला, माय-लेकाचं प्रेम पाहून सारं हळहळलं.. *मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची नाईक कुटूंबास सांत्वन भ...