चोपडा, प्रतिनिधी : अडावद गावात रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि आर सी सी अडावद यांच्या माध्यमातून विधवा महिलांना 40 मोफत निर्धूर चूल वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
सतत वाढणाऱ्या गॅस सिलेंडर च्या दरवाढीमुळे ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे चुलीवर जेवण बनवतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण निर्माण होते व चुलीवर जेवण बनवताना निर्माण होणारा धूर श्वसनाद्वारे महिलांच्या शरीरात जाऊन त्यांना दमा, खोकला सारख्या आजारांना सामोरे जावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून रोटरी क्लब चोपडा तर्फे मोफत निर्धूर चुल वाटप करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उप सरपंच भारती महाजन प्रमुख पाहुणे राकेश पाटील प्रमुख पाहुणे सचिन महाजन रोटरी क्लब अध्यक्ष ॲड रुपेश पाटील सचिव गौरव, महाले प्रकल्प प्रमुख डॉ अमोल पाटील, डॉ प्रफुल्ल पाटील, सुरेख मिस्त्री, पृथ्वीराज राजपूत, चेतन टाटिया, आरसीसी अध्यक्ष वृषीकेश देशमुख, भूषण पाटील व अडावद गावातील आरसीसी सदस्य हे सर्व कार्यक्रमाला उपस्थित होते.

No comments:
Post a Comment