Friday, 11 November 2022

५ डिसेंबर २०२२ पासून जळगाव जिल्हा परिषदेवर ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या बेमुदत उपोषण इशारा नोटीस !

५ डिसेंबर २०२२ पासून जळगाव जिल्हा परिषदेवर ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या बेमुदत उपोषण इशारा नोटीस !
 
जळगाव, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व ४ वर्गाच्या पदात दहा टक्के जागांचे आरक्षण ठेवलेले आहे. त्यात वयोमर्यादा 45 वर्षापर्यंतची आहे. जे ग्रामपंचायत कर्मचारी दहा वर्षे दहा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या आहेत अशांसाठी या जागा राखून आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वाट्याच्या दहा टक्के आरक्षणाच्या जागा जळगाव जिल्हा परिषदेमध्ये न भरल्यामुळे येत्या पाच डिसेंबर पासून जळगाव जिल्हा परिषदेवर ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने मदत उपचार करण्याचा इशारा दिलेला आहे तसे निवेदन जळगाव जिल्हा परिषदेला दिली आहे.
 
याबाबत सविस्तर असे की -
पण जळगाव जिल्हा परिषदेमध्ये कोणाला कालावधी असल्यामुळे गेल्या २०१९/२० २०२०/२१ २०२१/२२ व २०२२/२३ या ४
वर्षाच्या कालावधीतील जिल्हा परिषदेमध्ये रिक्त असणाऱ्या एकूण जागांपैकी दहा टक्के ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वाट्याच्या जागा जिल्हा परिषदेत भरण्यात आलेल्या नाही. त्यामुळे २०१९ भरतीच्या महिन्यामध्ये ज्या लोकांची वये कर्मचाऱ्यांची वये ४५ वर्षे पर्यंतच्या मर्यादित होती. त्यांची नावे सेवाजेष्ठता यादीतून वगळण्यात आलेली आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत जळगाव जिल्हा परिषदेने ताबडतोब निर्णय घ्यावा अशी महासंघाची मागणी आहे त्यावेळी दिलेल्या निवेदनात खालील मागण्यांच्या समावेश आहे.

१) जळगाव जिल्हा परिषदेत एप्रिल २०१९पासून दहा टक्के जागा भरल्या गेल्यात त्या सोडून २०१९/२०, २०/२१ ,२१/२२ या कालावधीत जेवढ्या जागा रिक्त आहेत व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे १०/% आरक्षणानुसार भरणे बाकी आहे त्यांची माहिती मिळावी.

२) गेली ३ वर्षे भरती बंद असल्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचे वये प्राप्त पात्र असूनही ती भरण्यात आली नाहीत त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे तेव्हा नवीन भरती करताना आरक्षण भरताना २०१९/२० साली ज्यांची वये ४५ चे आपस होती त्यांना३ वर्षे वाढ मिळून त्यांना आरक्षणासाठी पात्र समजण्यात यावी

३) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वाट्याच्या दहा टक्के आरक्षणाच्या जागा जळगाव जिल्हा परिषदेने विना विलंब भराव्यात ही भरती पारदर्शक व्हावी.

४) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवा जेष्ठता यादीनुसार जे कर्मचारी वरच्या क्रमांकावर आहेत अशा कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःहून विचारणा करून कागदपत्राची पूर्तता /अपूर्णता याबाबत खोटी माहिती देऊ नये दिशाभूल करू नये अन्यथा असा प्रकार सहेतुक असलेने व तो झाला तर त्यावेळी अँटी करप्शन अंतर्गत कारवाई झाली त्याला महासंघ जबाबदार राहणार नाही.

वरील मागण्यासंदर्भात जळगाव जिल्हा परिषदेने त्वरित कार्यवाही करावी. चार डिसेंबर 2022 महासंघाचे नेते कै. कॉ स ना भालेराव जयंती दिनापर्यंत कार्यवाही न झाल्यास ५ डिसेंबर २०२२ पासून कर्मचारी जिल्हा परिषद समोर सकाळी ११ वा पासून उपोषण करणार आहेत तरी कृपया तशी पाळी येऊ देऊ नये अमृत महाजन राज्य सचिव ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटक तसेच श्री नितीन सोनार व भगवान पाटील (चोपडा) सतीश परदेशी जळगाव श्री कांडेलकर मुक्ताईनगर श्री उखा डीवर व कारंडे बोडवड संदीप देवरे चाळीसगाव यांच्या उपस्थितीत श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान मध्ये झालेल्या बैठकीत देण्यात आला.

No comments:

Post a Comment

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वच्छतेचा बोजवारा..

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा.. घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत.. ...