Friday, 11 November 2022

*चोपडा तापी सहकारी सूतगिरणीच्या कारभार आदर्श व्हावा* किसान सभा

*चोपडा तापी सहकारी सूतगिरणीच्या कारभार आदर्श व्हावा* किसान सभा


चोपडा, प्रतिनिधी.. तालुक्यात कै. पाटील व डॉक्टर सुरेश जी पाटील यांचा पुढाकारातून चो सा का नंतर दुसरा सहकारी प्रकल्प चोपडा तापी सहकारी सूतगिरणी ची स्थापना झाली व बऱ्याच वर्षांनी ती बऱ्यापैकी कार्याान्वित झाले ली आहे. पण या सूतगिरणीच्या कारभार कापूस खरेदी विक्री कामगार भरती त्याचप्रमाणे इतर बाबींबाबत पारदर्शी राहिलेला नाही. त्यात पारदर्शकता येण्यासाठी तालुक्यातील सुत गिरणीच्या सामान्य सभासदांनी जागृत होणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी व कामगार हित या सहकाराच्या माध्यमातून जपने आवश्यक आहे.म्हणून आगामी पाच वर्षासाठी होऊ घातलेल्या सूतगिरणीच्या निवडणुकीत सहकाराचे जाणकार सुज्ञ लोक निवडून जाणे ही गरजेचे आहे अशाच सुज्ञ सभासदांच्या उमेदवार सभासदांच्या भरणा असलेल्या पॅनलला किसान सभा चोपडा तालुका पाठिंबा दिला असे पत्र किसान सभेचे पदाधिकारी सर्वश्री अनंत चौधरी वासुदेव कोळी अमृत महाजन शिवाजी पाटील कैलास महारू पाटील, गोरख वानखेडे, बाळू निंबा पाटील, धोंडू पाटील, पुंडलिक राजपूत मानसिंग राजपूत रतीलाल कंडक्टर कैलास पाटील माजी कंडक्टर ,मनोहर पाटील, यांनी काढले आहे

No comments:

Post a Comment

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वच्छतेचा बोजवारा..

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा.. घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत.. ...