Wednesday, 9 November 2022

वसई विरार शहरात परवाने नसलेल्या, वैधता संपलेल्या अनधिकृत रिक्षाचा सुळसुळाट !

वसई विरार शहरात परवाने नसलेल्या, वैधता संपलेल्या अनधिकृत रिक्षाचा सुळसुळाट ! 

पोलीस आयुक्तालय व वाहतुक पोलीस यांची कारवाईसाठी टाळाटाळ ; कारवाई करण्याची कॉंग्रेस पक्षाची मागणी...
*रूचिता अमित नाईक, अध्यक्षा कॉंग्रेस समेळगाव*


वसई, प्रतिनिधी : वसई विरार तालुक्यातील रिक्षाचालकांना वाहतुक शाखेकडून गणवेश सक्ती करण्यात आली आहे. तसेच असे असतांनाही वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणात विना गणवेशधारी शेकडो रिक्षाचालक रिक्षा चालवतांना दिसत आहेत. शहरात बेकायदेशीर रिक्षांचाही मोठा भरणा असून बेकायदेशीर रिक्षाचालक आपली पोळी भाजत असल्याचे दिसून येत आहे.


      कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी होताच शासनाकडून टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. यामुळे शहरातील रिक्षांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नुकतेच वाहतुक शाखेने रिक्षाचालकांना सुरक्षा कार्ड लावण्याची सक्ती करून गणवेश परिधान करण्याचे आदेश दिले होते. पण पोलिसांच्या या आदेशाचे कुठेही अंमलबजावणी होतांना दिसत नाही. विना गणवेश शेकडो रिक्शा रस्त्यावर धावत असल्याने नियमात राहून व्यवसाय करणाऱ्या रिक्शा चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील वाढत्या रिक्शा आता नागरीकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे वाहतुक पोलिसांनी कारवाई ची भुमिका हाती घ्यावी अशी मागणी नागरीकांनी माझ्याकडे केली असुन याबाबत पोलिस आयुक्तालय आणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची कारवाई मंदावली आहे. यामुळे वसई विरार शहरात दर वर्षी मोठ्याप्रमाणात वाहतुक वैद्यता संपलेल्या आणी परवाने नसलेल्या रिक्शा दाखल झाल्या आहेत. 


     या रिक्षावरील चालक, गणवेश नसलेले चर्सी, गर्दुल्ले, रिक्षा चालवत असल्याचे आढळून येत आहेत. अनेक रिक्षा वाहतुकीसाठी योग्य नसतांनाही रस्त्यावर धावत आहेत. अनेक रिक्षांना दिवे नाहीत. अनेक रिक्षा चालक गणवेश परिधान करत नाहीत. त्यांच्याकडे लायसन्स नाहीत, गाडीचे कोणतेही कागदपत्रेही नाहीत. अनेक गाड्यांवरील नंबर बोगस असावेत अशी दाट संशय व्यक्त केला जात आहेत.


     रिक्षा रस्त्यात कुठेही उभे करून रिक्षा चालक प्रवासी भरतात आणि उतरवतात यामुळे वाहतुक कोंडी निर्माण होत आहे. तसेच ठिकठिकाणी अनधिकृत रिक्षा थांबे तयार होऊ लागले आहेत. यातुन रस्ते अरुंद होऊन वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. 
     याबाबत सर्व सामान्य नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन अनधिकृत रिक्षाचालकांवर कारवाई करण्याबाबत रूचिता अमित नाईक कॉंग्रेस समेळगाव अध्यक्षा यांनी पोलिस आयुक्त सदानंद दाते साहेब यांची भेट घेऊन मागणी केली.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...