मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) ,:
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख सन्मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना अध्यक्ष श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, मा.आमदार श्री.दगडू दादा सकपाळ यांचे चिरंजीव जागतिक मानवाधिकार ए.एफ चे राष्ट्रीय अध्यक्ष व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली.
या निमित्ताने शिवसेना प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक श्री.यशवंत खोपकर, सचिव श्री.प्रमोद चौडकर, सहखजिनंदार श्री. सदाशिव लाड यांच्या शुभहस्ते पुष्पकरंडक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. सदिप चादिवडे, श्री.हितेन गायकवाड़, श्री.विनायक जाधव, श्री.दिपक चौधरी, श्री.बडु चौधरी, श्री. संजय चव्हाण, श्री. विश्वास तेली, श्री.अमोल वंजारे, श्री.लितेश केरकर, श्री.अमित देशमुख,श्री. लक्ष्मण साठे, श्री.आकाश शिंत्रे, श्री.सुमित पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री.जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ यांना सर्व मान्यवरांकडून अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:
Post a Comment